पोलीस प्रशिक्षण केंद्रातील निरूपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी आवाहन
By तेजराव दांडगे

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील निरूपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी आवाहन
जालना, दि. 15 : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यालयातील जुने, निरूपयोगी आणि वापरण्यास अयोग्य असलेले साहित्य आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. या साहित्याचे निर्लेखन करण्यात आले असून, खुल्या पद्धतीने निविदा व दरपत्रके मागवून ते अधिकृत खरेदीदार फर्म यांना विकले जाणार आहे.
इच्छुक खरेदीदारांना हे साहित्य दिनांक 16 मे, 2025 ते 20 मे, 2025 या कालावधीत पाहण्यासाठी उपलब्ध असेल. ज्या अधिकृत खरेदीदार फर्मना यामध्ये रस आहे, त्यांनी नमूद कालावधीत साहित्याची पाहणी करून, आपले बंद लिफाफ्यातील निविदा व दरपत्रके कार्यालयात सादर करावी.
या विक्रीसाठी असलेल्या साहित्याची सविस्तर यादी, आवश्यक सूचना, अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना यांच्या अधिकृत संकेतस्थळ WWW.PTCJALNA.COM वर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
साहित्याच्या प्रकारानुसार सर्वाधिक बोली लावणाऱ्या खरेदीदार फर्मचा विचार केला जाईल. तथापि, साहित्य विक्रीच्या प्रक्रियेचे सर्व अधिकार आणि कोणत्याही टप्प्यावर ही प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार कार्यालय प्रशासनाने राखून ठेवले आहेत.
इच्छुक अर्जदारांनी अर्जाचे नोंदणी शुल्क ₹ 500/- (पाचशे रुपये) आणि परतावा अनामत रक्कम (EMD) ₹ 10,000/- (दहा हजार रुपये) चा धनाकर्ष (Demand Draft) आगाऊ जमा करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.