आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
राजर्षी शाहू विद्यालय, कोसगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
By गौतम वाघ

राजर्षी शाहू विद्यालय, कोसगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
कोसगाव, दि. ०१: येथील राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी दोन्ही महापुरुषांना आदराने अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य कळम सर, दळवी सर, वाघ सर, कावळे सर, कोल्हे सर, देशमुख सर, शिंदे सर, पालकर सर, एन. पी. तळेकर आणि मंगेश वाघ उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.