आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
राजर्षी शाहू महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
By तेजराव दांडगे

राजर्षी शाहू महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
पारध, दि. ०१: येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, उपप्राचार्य अमोल बांडगे, प्रा. अनिल मगर, प्रा. रवींद्र पान पाटील, प्रा. रामेश्वर पाडळे, प्रा. लक्ष्मण सुसर, प्रा. राजू शिंदे, प्रा. संदीप ठाकूर, प्रा. लक्ष्मण खरात, प्रा. मंगेश लोखंडे, प्रा. दिनेश कापरे, विठ्ठल बोडके, विश्वास लोखंडे, संजय तबडे, वैभव भोरकडे, राहुल सुरडकर, कृष्णा आल्हाट आणि तुकाराम लोखंडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.