आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे

प्रचाररथांच्या माध्यमातून ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ कामांना वेग शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व गावांनी पुढे यावे 

By देवानंद बोर्डे

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

प्रचाररथांच्या माध्यमातून तलावांचे पुनरुज्जीवन कामांना वेग शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व गावांनी पुढे यावे 

जालना दि.9 : महाराष्ट्र शासनाच्या‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नालाखोलीकरण व रुंदीकरण’ या महत्वाकांक्षी योजनेचे राज्यात युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. प्रत्येक गावागावात जाऊन या योजनेचा प्रचाररथाद्वारे प्रचार-प्रसार तथा जनजागृती केली जात आहे. या प्रचाररथांना राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच ही योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जिल्हा, तालुका पातळीवर मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.

जालना जिल्हाधिकारी डॉश्रीकृष्ण पांचाळ, झेडपी सीईओ जगदिश मनियार,जलसंधारण अधिकारी सुंदर वाघमारे,सर्व गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी यांना ऑडिओ, व्हिडिओ, पीपीटी सादरीकरण या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्हाधिकारी सरांच्या शुभहस्ते प्रचाररथाचे उद्घाटन करुन जलरथाद्वारे यायोजनेची माहिती जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांमध्ये देण्यात आलीजिल्हाधिकारी डॉश्रीकृष्ण पांचाळ यांनी उपरोक्त योजनांसाठी शासनाने आर्थिक नियोजन केले असून आपल्या परिसरातील सर्व जलसाठ्यातीलगाळकाढण्यासाठी ग्रामपंचायत किंवा सेवाभावी संस्था पात्र आहेतआपलेगाव जलआत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अर्ज मागविण्यात येत असुन आपलेगाव पाणीदार करण्यासाठी शासनाच्या वरील योजनेचा लाभ घेऊन गावाच्या तलावातीलनालाखोलीकरण करुन गाळ काढुया आणि आपलेगाव जल आत्मनिर्भर बनवूयाअशीसादत्यांनी गावकऱ्यांना घातली.यायोजनेची माहिती गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यापोर्टलवर उपलब्ध असुनमागणी अर्ज डाउनलोड करुन अर्जात संपूर्ण माहिती नमुद करुन ते अर्ज संबंधित अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीसह फोटो कॉपी संबंधित लिंकवर अपलोड करावी असे ते म्हणाले‌

आतापर्यंत या योजनेचा प्रचार-प्रसार करणाऱ्या प्रचार रथाचे उद्घाटन राज्यातील 26 जिल्ह्यात संपन्न झाले.

यात अहिल्यानगरअकोलाभंडाराबुलढाणाछत्रपती संभाजीनगरहिंगोलीजळगावजालनानंदुरबारसांगलीसातारासोलापूरवाशिमयवतमाळधुळेवर्धा,अमरावतीधाराशीवगडचिरोली, लातूर, गोंदिया, कोल्हापूर, नागपूरपरभणीचंद्रपुर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.

 योजनेची सर्व माहिती तसेच अर्ज करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण’ म्हणजेच ‘www.shiwaar.com’ या शासनाच्या पोर्टलला भेट द्यावी.डिमांड जनरेशन या टॅबवरुन मागणी अर्ज डाउनलोड करून भरलेला अर्ज ‘बीजेएस अॅप’वर अपलोड करावा. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा,’असे आवाहनमृद व जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच सचिव गणेश पाटील यांनी केले आहे.

सदरील योजनेद्वारे शासन गावागावांतील तलावांमधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरीविधवाअपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.

शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणेशेतकरी यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणेजनजागृती करून जनआंदोलन उभे करणेमागणी अर्ज निर्माण करणे तसेच ‘गाळमुक्त धरण’ पोर्टलची निर्मिती करण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

बीजेएसने सर्व जिल्ह्यात नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक तसेच महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकर्‍यांना, ग्रामपंचायतींना, तालुका-जिल्हा प्रशासनाला सहयोग करीत आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे.जालना जिल्ह्यातील भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष श्रीविजयकुमार जैनदिपक मोदीविनयकोठारीविजयराज सुराणा, रोशनरुणवाल, नेमीचंद रुणवालअनिल संचेतीश्रीपाल मरलेचानरेंद्र जोगडराजेश लुनिया,स्वप्निल लव्हाडे, चैतन्य वायकोस, पंडित खुले,पवन सुराणा आदिकार्यकर्ते याकामासाठी वेळ देतआहेजिल्हा समन्वयक संदिप गवळी यांना गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेचामागणी अर्ज कशाप्रकारे भरावा याची माहिती देण्यासाठी संपर्क साधावा:- 7798937089

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??