युवा नाट्य,साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन;अमळनेर हे ज्ञानयोग,कर्मयोग,आणि भक्तियोग च त्रिवेणी संगम..
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील शिवाजी महाराज नाट्य गृहात काल शनिवारी सकाळी ११ वाजता युवा साहित्य संमेल नाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डीगंबर (राजू) महाले, संमेलनाचे उदघाटन व धग चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अभिनेत्री वीणा जामकर, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,जळगांव जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर,सुनिता राजे पवार, प्रकाश पायगुडे, तानसेन जगताप,कवी रमेश पवार,नरेंद्र निकुंभ,शरद सोनवणे,भाऊसाहेब देशमुख,दिनेश नाईक,रणजित शिंदे,विजया गायकवाड,माधुरी पाटील आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभीच सुप्रसिद्ध गायक डॉ.अमोघ जोशी व योगेश संदानशिव,नागेश खोडवे यांनी गणेशस्तुती सादर केली व शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. हा शुभारंभ सुरु असतांना अमळनेर येथील सुप्रसिद्ध नृत्यकलाकार नैना कुलकर्णी यांनी तांडव नृत्य केले. त्यानंतर प्रमुख अतिथी व मान्यवरांचे खानदेशी पद्धतीने टोपी रुमाल देऊन स्वागत केले. तर महिलांचे खण नारळाने ओटी भरून स्वागत करण्यात आले.
लोके काय म्हणतीन…..यावेळी अहिराणी भाषेत “लोके काय म्हणतीन” हा छोटा हास्यरंगाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी शुभेच्छा पत्र पाठवलेला संदेश वाचून दाखविण्यात आला. प्रास्ताविक कवी रमेश पवार यांनी केले.
त्यानंतर स्वागताध्यक्ष याचे मुख्य भाषण झाले.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिताताई वाघ, नगराध्यक्षा पुष्ललता पाटील सह सर्व वक्त्यांनी आपले विचार मांडले.
ज्ञानयोग, कर्मयोग,आणि भक्तियोग च त्रिवेणी संगम..
डिगंबर महाले -(युवानाट्य संमेलन स्वागताध्यक्ष)
संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी,पूज्य सनेगुरुजींची कर्मभूमी,श्रीमंत प्रताप शेट आणि विप्रो कंपनीची उद्योग भूमी व मंगलग्रह ची मंगल भूमी असलेले अमळनेर शहराची भूमी ज्ञानयोग,कर्मयोग, आणि भक्तियोग च त्रिवेणी संगम आहे या त्रिवेणी संगमात सुगंधाच्या दरवळीत या युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आगळ्या वेगळ्या सुगंधाची भर पडणार आहे जी निश्चितपणे चिरकाल टिकेल आणि उगवत्या कलावंतांना आणि साहित्यिकांना उकृष्ट करेल प्रेरणा देईल असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष डीगंबर महाले यांनी युवा नाट्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी केले.
जीवन हेच मुळात जीतं जागतं रंगमंच आहे,आपण वरच्या दिग्दर्शकाने लिहिलेल्या कथानकप्रमाणे आणि दिलेल्या पात्राप्रमाणे भूमिका निभावत असतो माणूस शंभर टक्के आहे तसाच तसा जगूच शकत नाही दिवसभरातून अनेकदा वेगवेगळ्या भूमिका करत असतो ते सुद्धा एक नाटकच असते या संमेलनासाठी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ यांनी देणगी व निधी दिला त्यांचेही ऋण व्यक्त केले.

कुठलेही सांस्कृतिक परंपरा नसलेल्या माझ्यासारख्या एका छोट्या मुलाला नाट्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.
हर्षल पाटील (युवा नाट्य,साहित्य संमेलन अध्यक्ष)संमेलनाची जबाबदारी हे माझ्यावर प्रचंड दडपण आहे पण मी ज्याच्या सोबत काम केलं या सर्व माझ्या मित्रांचे तसेच परिवर्तन संस्थेचे काम करतोय त्या परिवर्तनचा समूहाचा हा गौरव आहे. त्यांचं हे क्रेडिट आहे असं मला वाटतं साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद स्वतंत्र भरवते. नाट्य संमेलन स्वतंत्रपणे भरवणारे हे संमेलन खूप महत्वाचं आहे. माझ्या सारखी सगळी तरुण पिढी सध्या ही संक्रमणावस्था कुठे आहे आणि कुठल्या दिशेने प्रवास करावा अशा वेगळ्या वातावरणामध्ये आहे. हि भूमी एकेकाळचा समाजवादी आंदोलनाची तसेच प्रकार स्वातंत्र्य आंदोलन जागी पेटवलं त्यात साने गुरुजींची आणि तरुणांना जेव्हा जेव्हा एक वेगळ्या प्रकारचं वातावरण वाटलं आणि भरकटलेपण आलं तेव्हा तेव्हा त्या त्या काळातील महत्त्वाची मंडळी समोर आली. आणि त्यांना सामावून घेतलं मंडळी आपण ज्या भूमीत आहोत कधीकाळी या तुम्ही दिलेल्या कवितेचे शब्द घुमत असते. एकंदरीतच हा सारा परिसर बालकवींचा माधव ज्युलियन, केशवसुतांचा, मर्ढेकरांचा आहे. आणि खूप मोठी साहित्य परंपरा या विभागाला लाभली आणि अशा या परंपरेमध्ये खूप वर्षानंतर साहित्य नाट्य संमेलन होतं आणि त्याचा मान माझ्यासारख्या प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या तरुणाला मिळतंय याचा खूप आनंद अभिमान आहे.
जळगाव धुळे नंदुरबार अशा काही ठिकाणी नाटक होतं आणि ते पण पाहिलं तर कलेविषयीची प्रचंड अनास्था आमच्या परंपरा समृद्ध लोकभाषेचा प्रत्यंतर आमच्या नाटकात अजूनही दिसत नाही. काही प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आम्ही जाणतो आम्ही मराठी मध्ये आहे तोवर हा भाषिक न्यूनगंड आणि नाकारत नाही. हा न्यूनगंड दूर करत नाही तोवर आपलं नाटक पुढे जाणार नाही
लोकसंस्कृतीतले जे काही साहित्य ही परंपरा आहे तोवर माझ्या नाटकांमध्ये येत नाही आणि माझे कलेमध्ये येत नाही तोवर मानसिकता बदलणार नाही. त्यापुढे जाऊन आमच्यासाठी आमची भाषा मला महत्त्वाची वाटते म्हणून मला सुरुवातीला माझ्या भाषेत वाढवण्यासाठी हे महत्त्वाचं वाटते. एक गोष्ट अभ्यासक म्हणून आणि नाट्यशास्त्र संशोधन काम चालू आहे म्हणून मला वाटतं की लोकसाहित्याच्या संदर्भात बरेच काम होतं लोकपरंपरा संदर्भांमध्ये काम होतं लोकसाहित्यसाठी विद्यापीठ काही गोष्टी होतात. तसेच संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत भाषेचा निर्मितीसाठी संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली पण रंगभूमीसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे.
व्यक्त होण्याचं उत्तम माध्यम हे रंगमंचच आहे आणि रंगमंचावरच आपल्याला आपलं आपलं प्रतिबिंब मांडता येणार यामध्ये भारतीय परंपरा आणि लोकसंस्कृती पकडली जातात आपल्या शॉर्ट बट स्वीट हा काळ आणि या काळामध्ये व्यक्त होण्यासाठी आहे. माध्यमांमध्ये साहित्य आपल्याला जवळ करावा लागणार आहे. आमच्या देशामध्ये फारसे प्रयोग नाटकांचे साहित्याचे ठिकाणी होत नाही. अनेक ज्येष्ठ रंगकर्मी आणि बसलेले नाही असे आव्हान आहे. आव्हानात अधिक सांगितलेलं आहे तर आपण स्वीकारत नाही आणि स्पर्धेच्या पलीकडे जर आपण जात नाही तर आपला नाटकं पुढे झाला आणि स्पर्धा करायची आणि स्पर्धेमध्ये बक्षीसावर आनंद असतो.
स्पर्धेच्या पलिकडे आपण विचार करणार तर आपल्या गावाचं नाटक बाहेर जाऊ शकतो एकात्मिक वर कितने जवळच्या अमळनेर तालुक्यातल्या मंगरूळ गावचा मुलगा एका क्लिक वर आपल्या कुठल्यातरी थेटर मध्ये काय चाललंय ते पाहू शकतो यापूर्वी साहित्य प्रकाशित करणारे प्रकाशक वगैरे सगळी गोष्ट होती नव्हती. ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी व्यक्त होणार ती मी माझी रंगभूमी निर्माण करेल असा विश्वास त्या ठिकाणी माझ्याकडे येत नाही तोवर आपण पुढे जाणार नाही. साने गुरुजी युवा नाट्य साहित्य नगरी स्वतःला व्यक्त होण्याचं उत्तम माध्यम हे रंगमंचच आहे आणि रंगमंचावरच आपल्याला आपलं आपलं प्रतिबिंब मांडता येणार आहे असे मत युवा नाट्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हर्षल पाटील यांनी केले.
युवा नाट्य संमेलनातील गाजलेला परिसंवाद…
खान्देशची रंगभूमी सद्यस्थिती व भविष्य या विषयावर परिसंवाद दुपारी ३ ते ४ या वेळेत पूर्ण झाला.
तरुणांचा रंगभूमीवरील उत्साही वावर आणि नाट्य चळवळीतील सहभाग पाहता खान्देशी रंगभूमी चे भवितव्य उज्ज्वल असल्याचा विश्वास विविध नाट्य कलाकार,साहित्यिक व प्राध्यापक वक्त्यांनी दुपारच्या सत्रात “खान्देश रंगभूमी सद्यस्थिती व भविष्य” या विषयावरील परिसंवादात मांडले तर युवा श्रोत्यांमधून, आपल्या साहित्यिकांनी अहिराणी व बोलीभाषेतून व्यक्त होताना लाज वाटायला नको असा संतापवजा सूरही व्यक्त करण्यात आला.
बोलीभाषेतून व्यक्त झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिले गेले यातूनच खान्देशी साहित्तिक व रंगभूमीचे कलाकारांचे भवितव्य आशादायी राहील असे वक्त्यांनी सांगितले तर श्रोत्यांमधून उपस्थित निर्माता दिग्दर्शक शरद जाधव युवती , पत्रकार संजय पाटील, रणजित शिंदे ,अहिराणी नाटककार संतोष पाटिल, मनोज भांडारकर तसेच उपस्थित युवतींनीही खान्देशी रंगभूमी व बोलीभाषा स्थानिक साहित्य चळवळी साठी प्रश्न विचारत महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले.
नंदुरबार येथिल नागसेन पेंढारकर यांनी नाट्य चळवळीचा वेध घेतांना नाटकाचा ‘न’ माहीत नसलेले नंदुरबार आता ‘क’ पर्यंत पोहचले असल्याचे सांगितले. काबाड कष्ट करणाऱ्या श्रमजीविंचे सोंगाड्या पार्टी ते नाटक असा प्रवास खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात झाला असल्याचे सांगितले.स्वातंत्र्य पर्वकाळात मेळ प्रकारातून नाटकाचा प्रयोग सुरू झाला तो अव्याहतपणे सुरू असतांना खान्देशातील नाट्य कलावंत व साहित्यिकानी खान्देश रंगभूमीला एकत्रितपणे बळ द्यावे असे आवाहन केले.
जळगांव येथिल प्रा. राजेंद्र देशमुख यांनी खान्देशी रंगभूमी सशक्त आणि समृध्द करणारी पिढी तयार झालेली आहे.नाटकास यावकांनी करिअर म्हणून स्वीकारावे असे सांगितले तर जळगांव च्या रंगभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत प्रतिक ते परिवर्तन असा झालेला प्रवास कवी- केळी -कपाशी -कलावंत अश्या अंगाने झाला असल्याचे सांगितले.
नाशिक येथिल साहित्यिक किरण सोनार यांनी खान्देशातून प्रतिभावंत व नामवंत कलाकार राज्यासमोर यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.
ज्ञानेश्वर धोंडे जळगांव यांनी “संवेदनांचा काटा मनाला टूचणे म्हणजेच जीवनातील नाट्य आहे संवेदनशीलता आहे आणि रंगभूमीवर उत्तम ते देत राहू तो पर्यंत आपण निश्चितच उज्ज्वल भविष्यासाठी आशावादी आहोत.
विरेंद्र पाटील भुसावळ यांनी खान्देशच्या रंगभूमीने पुणे,मुंबईच्या प्रभावातून बाजूला व्हावे व स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे तसेच विचार ज्या भाषेच मनात जन्माला येतो त्याच भाषेत व्यक्त होणे गरजेचे आहे असे मत मांडले.
नारायण बाविस्कर,जळगांव हौशी व प्रायोगिक रंगभूमीच्या कलाकारांनी व्यावसायिक पातळीवर यशस्वी होण्याचा आदर्श नवयुवक नाट्य कलाकारांसमोर उभा करायला हवा.असे सांगितले.
मंचावर संमेलनाध्यक्ष हर्षल पाटील, स्वागताध्यक्ष डिगंबर महाले,आदि उपस्थित होते. प्रास्ताविक भाऊसाहेब देशमुख,अमळनेर यांनी केले. परिसंवादाचे अध्यक्ष जेष्ठ रंगकर्मी
चिंतामण पाटील ,जळगांव यांनी खान्देशची सद्याची रंगभूमी समृद्ध असल्याचे सांगितले.
प्रकट मुलाखत….संघर्षातून माझी निर्मिती साकारली गेली,सिनेमांच्या निर्मितीसाठी केलेले काम माझ्या जगण्याचा भाग आहे.जे शिकलो ते अनुभवातून व्यक्त करीत मोठा झालो.असा जीवन संघर्षाचा प्रवास मांडतांना मराठी फिल्म स्वतःसाठी करायची की लोकांसाठी याप्रश्नात उत्तर लोकांसाठी याबाबत स्पष्टता असणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे असे विचार मराठी सिनेनिर्माता दिग्दर्शक शिवाजीराव पाटिल यांनी व्यक्त केले.
प्रसिध्द अभिनेत्री विना जामकर यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडताना काही महत्वपूर्ण मुद्देही मांडलेत.मुलींना अभिनेत्री करणेसाठी पालक धास्तावलेले असतात ,चित्रपट क्षेत्रात आज नवोदितांच्या संघर्षाच्या काळात कास्टिंग काऊच्या निमित्ताने होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनेक चर्चा कुचर्चा पालकांच्या कानावर पडलेल्या असतात,
अश्यावेळी पालक,समाज,परिसर व चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी मिळून मुलींवर धीटपणाचे,धाडसाचे संस्कार करून तिला या ही क्षेत्रात पुढे पाठवायला हवे. या क्षेत्रात मुलींना करिअर करायला खूप संधी आहे.प्रामाणिक प्रयत्नांच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश नक्कीच मिळते असेही वीणा जामकर यांनी सांगितले.मुलाखत प्रा.विनय जोशी यांनी घेतली.
सायंकाळी एक नव्हे तर तब्बल तीन एकांकिका….
जून-जुलै, परिवर्तन संस्था जळगांव.
ती सात वर्ष मतिमंद माणुसकी,- मानवता बशुउद्देशीय संस्था धुळे.
रावीपर-प्रताप महाविद्यालय व कला विष्णू बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांनी नाट्य कला सादर केले होते.