Jalna: बॉडी बिल्डर स्पर्धेत भोकरदन तालुक्यातील पारध येथील शारुख पठाण जिल्ह्यातुन दुसरा
शारुख खान पठाण याने जालना श्री-2025 हा सन्मान जिल्ह्यातुन दुसरा क्रमांक पटकावून मिळवला
Jalna: बॉडी बिल्डर स्पर्धेत भोकरदन तालुक्यातील पारध येथील शारुख पठाण जिल्ह्यातुन दुसरा
जालना, दि. 17: जिल्ह्यातील बॉडी बिल्डिंग असोसिएशन व गुलजार ग्रुप बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे जालना शहर अध्यक्ष अल्ताफ कुरेशी यांच्या प्रयत्नातून दि. 17 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी सायं 6 वाजता इंटरनॅशनल कोठारी स्कुल, जे. ई. एस कॉलेज रोड जालना येथे जालना श्री- 2025 बॉडी बिल्डिंगचे आयोजन ईर्शाद बगबान, जावेद बिल्डर यांनी केले. या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील बिल्डर शारुख खान पठाण यांनी उत्कृष्ठ बॉडी प्रदर्शन करीत अनेक बॉडी बिल्डरांना मागे टाकत बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महत्वाचा मानला जाणारा जालना श्री-2025 हा सन्मान जिल्ह्यातुन दुसरा क्रमांक पटकावून आपल्या नावे केला.
शारुखला जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते श्री चा बेल्ट ट्रॉफी, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले. शारुख पठाण यांना गुलजार श्री-2025 चा बहुमान मिळताच त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा केला. तसेच पारध गावातील मित्रपरिवार व लहान मोठ्या ग्रामस्थ्यांनी व्हाट्सअँप व सोशल मीडियाच्या माध्यमातून शारुखवर कौतुकांचा वर्षाव केला. शारुख याने 56 ते 60 या वजन गटातुन जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकवला.
घरची अत्यंत हलाखीची परिस्थीती असल्यामुळे शारुख चे 9 वी पर्यंत शिक्षण झाले. परंतु शारुखला लहान पणापासूनच बॉडी बिल्डिंगचा छंद होता… घरच्या घरीच साध्या पद्धतीने व्यायाम करताना पाहून मित्रांनी याची जिद्द आणि शरीरयष्टी पाहून त्याला जीम मध्ये घेऊन गेले. नंतर 23 व्या वर्षी शारुखचा विवाह झाला. विवाहनंतरही शारुख बॉडी बिल्डिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी सारखे प्रयन्त करीत राहिला. या अगोदर शारुख जाफराबाद, औरंगाबाद, या स्पर्धेत 4-5 वेळा सहभागी झाला होता, परंतु त्याला यश आले नाही. तरीही तो खचला नाही, प्रयत्न करीतच राहिला आणि शेवटी जालना येथील जालना श्री-2025 च्या स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकवला.
आमच्या प्रतिनिधीने शारुखशी संवाद साधला त्यावेळी शारुख बोलला की, माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी शिक्षण शिकू शकलो नाही. त्यामुळे मी माझा छोटा मोटा व्यवसाय सांभाळून दररोज बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील आदित्य अर्बन हेल्थ क्लब या ठिकाणी 2 किलोमीटर जिमला पळत जायचो… आणि माझा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात एक नंबर आणून माझ्या गावाचे आणि माझ्या आई-वडिलांचे नाव मोठे करायचे आहे. त्यासाठी मी सतत प्रयन्त करणार आहे.