जालना येथील मल्टी मॉडेल लॉजीस्टिक पार्क (ड्रायपोर्ट) कार्यान्वित करण्याच्या कामांना वेग
By तेजराव दांडगे
जालना येथील मल्टी मॉडेल लॉजीस्टिक पार्क (ड्रायपोर्ट) कार्यान्वित करण्याच्या कामांना वेग
-
मार्च-2025 पर्यंत ड्रायपोर्ट कार्यान्वित होण्याची शक्यता
जालना, दि.17: जालना येथे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) संयुक्तपणे SPV नागपूर MMLP लिमिटेड यांच्यामार्फत जालना येथे “मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क” (ड्रायपोर्ट) (MMLP) प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी लॉजिस्टिक पार्कच्या विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जालना येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (MMLP) प्रकल्पास विकसित करुन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक जमीन भाडेतत्वावर आणि नोंदणी विषयक प्रश्न सुलभरित्या सोडवून या कामांना गती देण्याच्या जालना उपविभागीय अधिकारी, जालना तहसिलदार आणि नोंदणी व मुद्रांक विभाग यांना सूचना दिल्या. तसेच मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क” (ड्रायपोर्ट) मार्च-2025 पर्यंत कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने सर्व हलचलीना गती देण्यात यावी. यासाठी केंद्रस्तरावरुन आणि जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
यावेळी बैठकीस नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौर, विभागीय अधिकारी रविंद्र गुप्ता, नागपूर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रा. लिमिटडचे सह सल्लागार अदरीजीत बिस्वास, प्रकल्प व्यवस्थापक विकास मलीक, कॉनकोरचे सहायक अधिकारी शिरीष तळेले, जालना तहसिलदार छाया पवार यांची उपस्थिती होती.