डिझेल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस, जालना पोलिसांची दमदार कारवाई
By तेजराव दांडगे
डिझेल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस, जालना पोलिसांची दमदार कारवाई
तलवारीचा धाक दाखवुन डिझेल चोरी करणारे तसेच बुलढाणा जिल्ह्यात दरोडा टाकुन पळून जाणारे डिझेल चोर तलवार, कार, चोरलेल्या डिझेल व चोरण्यास लागणाऱ्या साहित्य असा एकुण 6,77,600 रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद (डिझेल चोरीचे एकुण 9 गुन्हे उघडकीस)
जालना, दि. 04: जालना जिल्ह्यात बऱ्याच दिवसांपासुन डिझेल चोरीचे गुन्हे घडत होते, त्याअनुषंगाने डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना समृध्दी महामार्गावरील व ईतरत्र ठिकाणी होणाऱ्या डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने दिनांक 03/01/2025 रोजी सकाळी 07.00 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे डिझेल चोरांची माहिती घेप्त असतांना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कि, पाण्याची टाकी, इंदेवाडी, जालना येथे काही संशईत लोक हे चोरीचे डिझेल विक्री करीत आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन पथकातील अधिकारी-अंमलदार हे पाण्याची टाकी इंदेवाडी येथे गेले असता त्यांना पाहुन डिझेल चोर हे कारसह सुसाट वेगाने अंबड चौफुली ते मंठा चौफुलीकडे जाणाऱ्या रोडने निघाले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना हॉटेल जालना पॅलेस जवळ खरपुडी कडे जाणाऱ्या रोडवर अडविले असता संशईत डिझेल चोर हे पळु लागल्याने त्यांना आजु-बाजुच्या लोकांच्या मदतीने त्यांचा धावत पाठलाग करुन त्यांच्याशी झटापट करुन अनिल मधुकर वाघमारे, वय 27 वर्ष, रा. ढोलखेडा बुद्रुक, ता. जाफ्राबाद, जि. जालना व राहुल राधाकिसन कोकाटे, वय 24 वर्ष, रा. रांझ ाणगाव, ता. बदनापुर, जि. जालना यांना ताब्यात घेऊन तपासाचे कौशल्य वापरुन विचारपुस केली असता त्यांनी पोलीस ठाणे चंदणझिरा, गोंदी, अंबड, तालुका जालना, मौजपुरी, हसनाबाद गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच बुलढाणा येथील पोलीस ठाणे बिबी हद्दीत समृध्दी महामार्गावर सुध्दा तलवारीचा धाक दाखवुन दरोडा टाकुन डिझेल लुटत असतांना पोलीस आल्याचे पाहुन पळुन आल्याबाबतची कबुली दिली आहे.
आरोपीतांकडुन एकुण डिझेल चोरीचे साहित्यासह डिझेल चोरीकरता वापरत असलेले पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर कार, तसेच निर्जणस्थळी चालकांना धाक दाखविण्याकरीता वापरत असलेली तलवार व चोरलेले डिझेल असा एकुण 6,77,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पळुन गेलेल्या आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अर्मलदार रामप्रसाद पव्हरे, गोपाल गोशिक, कैलास खाडे, जगदीश बावणे, सागर बाविस्कर, ईरशाद पटेल, देविदास भोजने, संदीप चिंचोले, रमेश काळे, सचिन राऊत, योगेश सहाने, भागवत खरात यांनी केली आहे.