राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन
पारध, दि. 03: भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे राजर्षी शाहू महाविद्यालय पारध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावंगी अवघडराव येथे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन महंत दौलतरामाजी बाबा महाराज श्री पाताळेश्वर संस्थान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ ग्रामीण साहित्यिक रामराव रिंढे, उपसरपंच नकुल गणेशभाऊ फुसे, मुख्याध्यापक त्र्यंबक न्याहालसिंग राजपूत, कार्यनिधीक्षक के.टी. वाघ, यांची उपस्थिती होती. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र पानपाटील यांनी केले तर वैष्णवी लोखंडे व दिपाली इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल मगर तर आभार प्रा. रामेश्वर पाडळे यांनी मानले यावेळी सेवक राहुल सुरडकर, स्वयंसेवक, स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.