शिक्षण
हवेली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गोल्डन सियारा पब्लिक स्कूल येथे २४ व २५ डिसेंबर रोजी संपन्न.; कदमवकवस्ती..
पुणे (हवेली) : जिल्हा परिषद, पुणे व पंचायत समिती, हवेली (शिक्षण विभाग, हवेली) मुख्याध्यापक संघ आणि गणित व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे हवेली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ गोल्डन सियारा पब्लिक स्कूल येथे २४ व २५ डिसेंबर रोजी संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी, भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी माध्य., जि. प. पुणे), ज्ञानदेव खोसे (गटशिक्षणाधिकारी, पं. स. हवेली), भरत इंदलकर (विस्तार अधिकारी, पं. स. हवेली), राजेंद्र जगताप (विस्तार अधिकारी, पं. स. हवेली), शैलेश अर्जुन चंद (संस्थापक/अध्यक्ष, गोल्डन सियारा पब्लिक स्कूल), रमेश अर्जुन चंद (उपाध्यक्ष, गोल्डन सियारा पब्लिक स्कूल), अजिंक्य कांचन (सचिव, अजिंक्य चॅरिटेबल ट्रस्ट), प्रिती खणगे (मुख्याध्यापिका, गोल्डन सियारा पब्लिक स्कूल) आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मा. कारेकर साहेबांनी सर्व सहभागी विदयार्थ्यांचे व त्यांच्या विविध प्रयोगांचे कौतुक करताना आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपसण्याची गरज असल्याचे नमूद केले. शिवाय, अशा छोट्याश्या प्रदर्शनातून व प्रकल्पातूनच उद्याचे मोठे शास्त्रज्ञ निर्माण होऊन देशाचे नाव मोठे करतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्याच बरोबर, गोल्डन सियारा शाळेच्या प्रगतीचे व अगदी कमी वेळेत देखील केलेल्या नियोजनाचे कौतुक केले.
यावेळी इतर उपस्थित मान्यवरांनीदेखील आपल्या भाषणामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांची स्तुती करताना शाळेच्या एकंदरीत नियोजनाबद्दल आनंद आणि आभार व्यक्त केले.
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास १०७ विविध प्रकल्पांची नोंदणी झाली. यामध्ये ६ वी ते ८ वी, ९ वी ते १२ वी, दिव्यांग तसेच शिक्षक व प्रयोगशाळा परिचर अशा वेगवेगळ्या गटांमध्ये प्रदर्शनाचे वर्गीकरण करण्यात आले होते.
विज्ञान विषयाशी निगडित वक्तृत्व, प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धादेखील आयोजित केल्या होत्या. हवेली तालुक्यांतर्गत येणाऱ्या विविध शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
या प्रदर्शनास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. समारोप प्रसंगी ज़िल्हा परिषद, पुणे, मुख्याध्यापक संघ व परीक्षक वर्गातील मान्यवरांनी आपापल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप टाकली व शाळेने केलेल्या सुव्यवस्थापनाबद्दल आभार मानले.
प्रत्येक गटानुसार व प्रकारानुसार काढण्यात आलेल्या प्रथम तीन क्रमांकातील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे, तर सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. सर्व मान्यवरांचादेखील यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशपांडे मॅडम व मेमाणे सरांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रीती खणगे यांनी केले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.