आपला जिल्हाराजकीय
ग्रामसभेचा निर्णयाविनाच गाशा गुंडाळण्यात आला. यामध्ये १ नंबर वार्ड पाण्याविणा किती दिवस वंचित राहणार ग्रामस्थांचा सवाल? ; कदमवाकवस्ती..
पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व फुरसुंगी या दरम्यानच्या शिवरस्त्याचा वाद कदमवाकवस्तीच्या ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच गाजला.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडी माळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (ता.२५) सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असता. ही ग्रामसभा उपसरपंच व सभेचे अध्यक्ष नासीरखान पठाण व ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यावेळी माजी सरपंच गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, बिना काळभोर, रूपाली काळभोर, अभिजीत बडदे, मंदाकिनी नामूगडे, अशोक शिंदे, दीपक आढाळे, सुशील महाराज काळभोर, मुकुल काळभोर, प्रीतम काळभोर, नितीन टिळेकर, विशाल गुजर, ऍडव्होकेट राहुल झेंडे, अविनाश बडदे, गौरव काळभोर, प्रतीक काळभोर, नितीन लोखंडे, पोलीस पाटील प्रियंका भिसे, उपस्थित होते.
नवपरिवर्तन फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड
कदमवाकवस्ती गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरीकरणाचा वेग हा प्रचंड आहे. नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच गावातील आपला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण करुन खत निर्माण करण्यात येईल व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीमधील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी मदत होईल. कचर्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा कचरा प्रत्येक घरातून संकलीत करताना प्रत्येक घरातून एनजीओ/संस्थेमार्फत कचरा गोळा करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक घरासाठी किमान प्रतिमाह ५० ते ६० रुपये संस्थेला द्यावे लागतील. कचरा इतरत्र टाकणाऱ्या नागरिकांवर विद्रुपकरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच गावाच्या नकाशात पडलेले सर्व पीएमआरडीचे रस्ते खुले करण्यात यावेत. शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळावा, यासाठी ग्रामपंचायतमध्ये मदत कक्ष उभारण्यात यावा, कदमवाकवस्ती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा रस्ता व शिवरस्ता व्हावा, अशा विविध मागण्या यावेळी नवपरिवर्तन फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड ग्रामसभेत मांडल्या.
जवळपास असणाऱ्या पीएमआरडीए व शिवरस्त्याच्या मागणीवर बोलताना माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर व गौरव काळभोर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतातून अगोदरच १०० फुटाचा डीपी रोड गेला आहे. त्यानंतर १०० फुटावरूनच जर शिव रस्ता जाणार असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. दोन्ही रस्त्या ऐवजी एक रस्त्याला आमचा विरोध नाही. त्यामुळे डीपी रोडचा प्रस्ताव रद्द करा त्याला आमचा सर्वानुमते पाठींबा आहे, असे यावेळी सांगितले. तसेच पाण्याची पाईपलाईन कवडी माळवाडी ते ग्रामपंचायतीला कोठून आणणार? पुणे- सोलापूर महामार्गावरून का आणणार नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला.
अखेर सभेमध्ये सत्ताधारी व विरोध यांचे शिष्टमंडळ करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात येईल असे ग्रामसेवक अमोव घोळवे यांनी सांगितले.
ग्रामसभेत रस्ता व पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाइनचा कुठल्याही निर्णय झाला नाही. अखेर ग्रामसभेचा निर्णयाविनाच गाशा गुंडाळण्यात आला. यामध्ये १ नंबर वार्ड पाण्याविणा किती दिवस वंचित राहणार हे आत्ता तरी सांगता येणे कठीण असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा होती.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.