पुणे : काही दिवसांपासून या माेकाट कुत्र्यांचा त्रास फक्त रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना हाेत हाेता. पण आता दिवसाही भटक्या कुत्र्यापासुन नागरिक दहशतीखाली आहेत. ज्यामुळे भरदिवसा फिरणे अवघड झाले आहे. ही भटकी कुत्री एवढी निर्ढावली आहेत की, सरळ साेसायटींच्या आवारात खेळणाऱ्या लहान मुलांनवर दिवसाढवळ्या हल्ला करत आहेत.
ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत; तर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत ..
पुणे शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल २३ हजार ३७४ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यानंतरही प्रशासन ठाेस कारवाई करताना दिसत नाही. या प्रशासनाच्या ढिसाळ, कामकाजा विरोधात नागरिकांनी कित्येक वेळा नाराजी व्यक्त केली.
आंबेगाव पठारमधील चंद्रागण सोसायटी फेज नंबर ०७ मध्ये पार्किंगमध्ये खेळत असताना समर्थ सूर्यवंशी या पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरासह हडपसर उपनगरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गल्लीबोळांमध्ये समूहाने राहणारी भटकी कुत्री रात्री-अपरात्री गाड्यांवर धावून जातात. वाहनचालकाच्या पायाचा चावा घेतात. पदपथांवर चालणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने तात्काळ संबंधित अधिकारी यांना तशा सुचना देउन उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने परिसरातील नागरिक करत असतात
आठ महिन्यांत जवळपास ३७,४९५ कुत्र्यांवर नसबंदी
पुणे महापालिकेने २०२४ च्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३७ हजार ४८६ भटकी आणि मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. या कुत्र्यांना रेबीजचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.
नागरिकांच्या झोपेचे खोबरे..
उपनगरांसह शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत. तसेच काही भागांत टोळीने राहणारी ही भटकी कुत्री रात्रीच्या वेळी प्रचंड मोठ्या व विचित्र आवाजात विव्हळल्याने नागरिकांच्या झोप मोड होत आह.
उपाययोजना अपूर्ण पडत आहेत का?
रस्त्यावर टाकला जाणार कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणारे प्राणी प्रेमी, कुठेही खाऊ घालून पुण्य कमवणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमितपणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते; परंतु भटक्या कुत्र्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता या उपाययोजना खूपच अपूर्ण पडत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
भटकी कुत्री चावल्याच्या घटना
२०१९ – १२ हजार २५२
२०२० – १२ हजार ७३४
२०२१ – १५ हजार ९७२
२०२२ – १६ हजार ०७७
२०२३ – २१ हजार ००२
२०२४ मध्ये कुत्र्यांनी घेतला चावा
जानेवारी : १९७३
फेब्रुवारी : २०९३
मार्च : १९६१
एप्रिल : १९२०
मे : २८३९
जून : २१९९
जुलै : २०१२
ऑगस्ट : १९३७
सप्टेंबर : २०२६
ऑक्टोबर : २१८९
नोव्हेंबर : २२२५
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??