पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अनुद्गार काढले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दांडेकर पूल परिसरात आंदोलन करण्यात आले.
‘अमित शहा माफी मागा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशा घोषणा देण्यात आल्या.
सकाळी 11 च्या सुमारास आंदोलकांनी दांडेकर पूल परिसरात काही वेळ ‘रास्ता रोको’ करण्यात आला. ‘डॉ. आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिल्यामुळेच शहा हे गृहमंत्री झाले आहेत. त्यांच्यात सत्तेचा माज आला आहे,’ असा घणाघात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला. यावेळी शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा देवाचे नाव घेतले तर तुम्हाला स्वर्ग गाठायला मिळेल,’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचा निषेध करण्याासाठी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. ‘देशातील पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांबाबत आमच्या मनात प्रचंड आदर आहे. ‘महामानवांविषयी काढलेली अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत,’ असा खणखणीत इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी उपस्थित आंदोलकांनी घोषणा देऊन शहांच्या वक्तव्याचा निषेध करीत ‘रास्ता रोको’ केला. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तुम्हाला गृहमंत्रिपदापर्यंत पोहोचवले – संजय मोरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. ‘राज्यघटनेच्या जीवावर अमित शहा गृहमंत्री असून, डॉ. बाबासाहेबांनी मिळवून दिलेला हक्क तुम्ही विसरला आहात. तडीपारीची कारवाई तुमच्यावर असतानाही संविधानाने तुम्हाला गृहमंत्रिपदापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. याप्रकरणी शहांनी बिनशर्त माफी मागावी,’ अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.
सभा घेऊन दाखवावी, ‘शिवसेना स्टाइल’ उत्तर देऊ – गजानन थरकुडे
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाजपच्या मनात आकस असून, त्यांच्या बोलण्यातून तो दाखवून दिला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. देव कोणीही पाहिला नाही. परंतु डॉ. बाबासाहेबांना पाहणारे अनुयायी आजही आहेत. गृहमंत्री अमित शहांनी पुण्यात सभा घेऊन दाखवावी. आम्ही त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देऊ,’ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी दिला.
यावेळी प्रदेश संघटक वसंत मोरे, प्रसिद्धिप्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, किशोर रजपूत, बाळासाहेब भांडे, उमेश गालिंदे, नीलेश जठार, विभागप्रमुख सूरज लोखंडे, प्रसाद काकडे, गोविंद निंबाळकर, प्रसाद चावरे, संदीप गायकवाड, अजय परदेशी, अनिल माझिरे, मनीष जगदाळे, नंदू येवले, राजू चव्हाण, दिलीप पोमण, मारुती ननावरे, मकरंद पेठकर, अजित बांदल, युवासेनेचे शहर अधिकारी राम थरकुडे, परेश खांडके, गौरव पापळ, विलास नावडकर, ज्ञानंद कोंढरे, विजय जोरी, संजय साळवी, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, नितीन निगडे, स्वप्नील जोगदंड, नितीन रावलेकर, अरविंद दाभोलकर, निखिल जाधव, तानाजी लोहकरे, प्रतीक गालिंदे, नितीन दलभजन, बाळासाहेब गरुड, अप्पा आखाडे, शिवाजी पासलकर, राहुल शेडगे, रमेश लडकत, गणेश घोलप, सुनील गायकवाड, नंदू जांभळे, देवेंद्र शेळके, शरद गुप्ते, सचिन मोहिते, मिलिंद माने, अमोल रणपिसे, गणेश वायाळ, सागर देठे, सतीश गवळी, शहादू ओव्हाळ, आकाश बालवडकर, महिला आघाडीच्या वतीने वैशाली कापसे, शीतल जाधव, कमल रोकडे, मथुराबाई गवळी, तसेच स्थानिक नागरिक, आंबेडकरप्रेमींनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??