सुनिल थोरात वार्ताहर)
पुणे : पुणे जिल्ह्याचे भौगोलिक व औद्योगिक क्षेत्र, वाढते नागरीकीकरण तसेच आपत्तीच्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यानुसार असणारा जलद प्रतिसाद याकरीता लागणारी साधने याबाबींचा सर्वांगिण विचार करता सर्व विभागाचा सहभाग घेत राज्याकरीता दिशादर्शक ठरेल, यास्वरुपाचा आदर्श आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक संजय गिरी, सिड्स टेक्निकल सर्व्हिसेसचे अभिजित घोरपडे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतूदीनुसार जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करणे आवश्यक आहे, याकरीता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्ह्यातील सर्वसंबंधित विभाग, विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करुन घ्यावे. जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षा, आरोग्य विभागाचे आराखडेही यामध्ये समावेश करण्यात यावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यामदतीने सर्व संबंधित विभागानी आपल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करावे, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.
घोरपडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाने सिड्स टेक्निकल सर्व्हिसेस यासंस्थेच्या मदतीने जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीचे काम सुरु आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने विभागाने सूचना कराव्यात, असे आवाहन घोरपडे यांनी केले.
या कार्यशाळेत सर्व विभागातील अधिकारी व विभाग प्रमुखांनी सहभाग नोंदवला तसेच संभाव्य आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने गटकार्याच्या माध्यमातून आरखडे तयार करून सादरीकरण करण्यात आले.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??