राजकीय

इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी सत्यशील पाटील; हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न..

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

डॉ गजानन टिंगरे (वार्ताहर)

पुणे (इंदापूर) : इंदापूर येथील अग्रगण्य बँक असलेल्या इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सत्यशील भिकाजीराव पाटील (वालचंदनगर) यांची सोमवारी (दि.१६) बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीनंतर बँकेचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

नूतन अध्यक्षाच्या निवडीसाठी बँकेच्या सभागृहामध्ये संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सत्यशील पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या अध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीची घोषणा बारामतीचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गडे यांनी केली.

यावेळी बँकेचे संचालक संदीप गुळवे, विकास देवकर, लालासाो सपकळ, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, मच्छिंद्र शेटे-पाटील, गोविंद रणवरे, स्वप्नील सावंत, मनोज मोरे, संजय जगताप, सुभाष बोंगाणे, डॉ.मिलिंद खाडे, संजय रायसोनी, डॉ.अश्विनी ठोंबरे, डॉ.दिपाली खबाले, विजय पांढरे, तानाजी निंबाळकर, प्रशांत भिसे, गिरीष शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तावरे उपस्थित होते. सत्यशील पाटील हे सध्या बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले की, बँकेने इंदापूर तालुक्यातील युवक, महिला, उद्योजक यांना सहकार्य केल्याने आज हजारो कुटुंबाना आर्थिक आधार प्राप्त झाला आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मंत्रिमंडळामध्ये असताना स्थापन केलेल्या बँकेस अ वर्ग मिळालेला आहे. गतवर्षी बँकेस सुमारे साडे पाच कोटी रुपये नफा झालेला आहे. त्यामुळे सभासदांना डिव्हीडंट देणे संदर्भातील प्रस्ताव बँकेने रिझर्व बॅंकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. बँकेचे कामकाज प्रगतीपथावर असून, बँकेचा सलग २ वर्ष एनपीए हा शून्य टक्के असल्याचे गौरोदगार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

इंदापूर अर्बन बँकेने ठेवीदारांचा मोठा विश्वास प्राप्त केला आहे. गरजू व्यक्तीना त्यांची अडचण असताना बँकेने कर्ज देऊन त्यांची अडचण भागवली आहे. बँकेने कर्जदाराला दिलेले पैसे हे ठेवीदारांचे पैसे आहेत. त्यामुळे कर्ज वसुलीकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना संचालक मंडळास हर्षवर्धन पाटील यांनी केली.

प्रास्ताविक अँड. गिरीश शहा यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड.तेजसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पं. स, जिल्हा परिषद आदी सर्व निवडणुका पक्ष हा हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली लढवेल, असे भाषणात त्यांनी नमूद केले. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अँड. शरद जामदार, अमरसिंह पाटील, महारुद्र पाटील, अमोल भिसे, कालिदास देवकर, राहुल मखरे, सागर मिसाळ, उत्तम जाधव, दत्तात्रय शिर्के, बाबा महाराज खरतोडे, सुरेश मेहेर, रघुनाथ राऊत, मोहन दुधाळ, छगन भोंगळे, पिंटू काळे, तानाजी नाईक, प्रा.कृष्णा ताटे, पांडुरंग शिंदे, विक्रम कोरटकर, बाळासाहेब मोरे आदीसह पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक स्वप्निल सावंत यांनी मानले.

इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेचा सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन्हीं आर्थिक वर्षासाठी शून्य टक्के एनपीएच्या सक्षम अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनने २ स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्रे देऊन बँकेचा नुकताच गौरव केला आहे. बँकेच्या ४ शाखांना लवकरच रिझर्व बँकेकडून परवानगी मिळणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात स्पष्ट केले.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??