गांधी जयंती निमित्त शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप च्या वतीने शिवाजी उद्यानात स्वच्छता मोहीम..
शिवरायांच्या पुतळ्याजवळ वृक्षारोपन,असंख्य महिला व पुरुषांचा सहभागअमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील नगरपरिषद मालकीच्या शिवाजी उद्यानात शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप च्या वतीने जोमाने स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला,राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियांनंतर्गत हे अभियान राबविण्यात आले,यात ग्रुपच्या असंख्य महिला व पुरुष सदस्यांसह जेष्ठ श्रेष्ठ मंडळींनी उत्साहात सहभाग नोंदविला.
यावेळी ग्रुप सदस्य ऍड महेश बागुल यांच्या सहयोगाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरणाच्या दृष्टीकोनातून गुलाबाच्या फुलांची रोपे लावण्यात आली,तसेच झाडून उद्यान चकचकीत केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेला कचरा न प कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर फेकण्यात आला.सुमारे दोन तास हे अभियान राबविण्यात आले,सदर मोहिमेबद्दल न प तील सत्ता धारी आघाडीचे नेते माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील, व मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी ग्रुपचे कौतुक करत हा ग्रुप उद्यानात कार्यरत झाल्यापासून उद्यानाची चांगल्याप्रकारे देखभाल दुरुस्ती होत असल्याची भावना व्यक्त केली.सदर मोहिमेत ग्रुप सदस्य तथा न प चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी,पर्यंक पटेल,डॉ शरद बाविस्कर,भरत कोठारी,सिद्धार्थ सोनवणे,गजेंद्र भामरे,नाना अमृतकार,श्री शिंपी,पप्पू शर्मा,जयदीप राजपूत,चेतन राजपूत,प्रविण संदानशिव,सुरेश झाबक,विनोंद जैन,प्रविण पारेख,मलिक दादा,इम्रान खाटीक,महाराजा पाटील,तेजस जांमखेडकर,राजेंद्र चौधरी,देविदास देसले,डॉ शरद शेवाळे,नरेंद्र चौधरी,के एल पाटील,जहुर शेख, दिलीप जैन तसेच डॉ सौ अंजली चव्हाण,डॉ सौ हिरा बाविस्कर,सौ उज्वला शिरोडे,सौ वंदना शिंपी,सौ दीपिका शिंपी,सौ मीना आठवले,सौ ज्योती मराठे,सौ कोमल बितराई,समीना बुऱ्हानी,इंदूबाई सोनवणे,सौ कृष्णाबेन पटेल,सौ शिंपी,सौ नूतन पारख,सौ मनीषा सराफ, सौ स्वाती खंदार यासह असंख्य महिला भगिनींनी सहभाग नोंदविला.