सावखेडा माध्यमिक विद्यालयातुन २५००० किमतीचा माल लंपास…
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथील के.डी. पाटील हायस्कुल येथे रात्री शाळेचे कुलूप तोडून शालेय पोषण आहाराची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .
याबाबत सविस्तर वृत असे की , दि, ३ आक्टोबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान महादू भोई शिपाई यांनी शाळा उघडले असता त्यावेळी त्यांना शालेय पोषण आहारची खोलीचे कुलुप तोडलेलं व दरवाजा अर्धवट उघडलेला दिसल्याने मुख्याधापक भगवान सोनवणे यांना फोन करून घडलेली घटना सांगितली २ अक्टोंबर रोजी रात्री चोरी झाली आहे.मुख्याध्यापक भगवान सोनवणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे .
चोरी झालेला मालाचा तपशिल तांदुळ दहा क्विंटल वटाणा अठ्ठावन्न किलो, मठ्-चाळीस किलो, आणि हरबरा चाळीस किलो मालाची चोरी झाली असुन एकुण चोवीस हजार आठशे सहा रुपयाचा पंचनामा करण्यांत आला असल्याचे पोलिसा कडून सांगण्यांत आले .
अमळनेर पोलिस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण खैरनार पातोंडा बिट चे पो.हेड.कॉ.विजय साळुंखे, पो.कॉ.सुनिल पाटील,रविंद्र पाटील,यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत ,