राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मौन व्रत धारण करून अनोखे आंदोलन..
शासनाचा निषेध,सर्व आश्वासने फसवे असल्याचा केला आरोप,विविध मागण्या सादरअमळनेर-(प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काल केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन व्रत धारण करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले,यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना व आश्वासने फसवे असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी करून विविध मागण्या प्रशासनाकडे सादर करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अनिल भाईदास पाटील यांनीही आंदोलन कर्त्यांना प्रोत्साहन देत शासनाचा निषेध नोंदविला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून तहसील कचेरी आवारात हे आंदोलन करण्यात आले,यात मोठया संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते,संपूर्ण राज्यात हे मौनव्रत आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी दिली.तसेच २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचं फसव आश्वा सन,मोठया प्रमाणात होत असलेली पेट्रोल डीझेल दरवाढ,आश्वा सनाप्रमाणे कोणाच्याही खात्यात १५ लाख रुपये न पडणे, महिलांवरील वाढणारे अत्याचार ,राफेल विमान घोटाळा आदी मुद्दे पुढे करून अमळनेर विधानसभाक्षेत्राची आणेवारी ५० पैश्याच्या आत लावा,अमळनेर विधानसभा क्षेत्राला दुष्काळी जाहीर करा, तसेच पाडळसरे धरणाला लवकरात निधी उपलब्ध करुन द्यावा आदी महत्वपूर्ण मागण्या आमच्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस च्या जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील यांनी दिली.
सदर आंदोलनात जिल्हा बँकेच्या संचालीका सौ तिलोत्तमा पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख भागवत पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शिवाजीराव पाटील, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम सर, महिला प्रदेश सरचिटणीस प्रा रंजना देशमुख, पं.स.सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, कृ.उ.बा.स. संचालक विजय प्रभाकर पाटील, मा.पं.स. सदस्य संदेश पाटील, जेष्ठ नेते रणजित पाटील, जेष्ठ नेते नाना पाटील, इम्रान खाटीक, गौरव पाटील, संजुआबा पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष बाळू पाटील विद्यार्थी शहराध्यक्ष सुनील शिंपी, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील महिला शहराध्यक्ष आशाताई चावारीया, सामा-जिक न्याय तालुकाध्यक्ष एस.बी.बैसाणे सर, किसान सेलचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, एस.टी.कामगार नेते एल.टी. पाटील, कामगार नेते पी.वाय.पाटील, भुषण पाटील, ग्रंथालय सेल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर देसले, उमाकांत साळुंखे, प्रकाश पाटील, भरत पाटील, दीपक पाटील, भुषण पाटील, प्रशांत भदाणे, तालुकाउपाध्यक्ष हिंमत पाटील निंभोरा, डॉ.रामराव पाटील, सबगव्हाण सरपंच नरेंद्र पाटील, गलवाड्याचे उपसरपंच सुनिल पवार, अलीम मुजावर, गजानन पाटील, उदयनराजे पाटील, कल्पेश गुजराथी, राहुल गोत्राळ,भुषण भदाणे,नितिन भदाणे, युवक उपाध्यक्ष निलेश ठाकरे, निलेश देशमुख, अबीद अली सय्यद अली, पप्पु कलोसे आदी कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला.