Breaking
शेतातील शेती साहित्य चोरीने परिसरातील शेतकरी धास्तावले…
अमळनेर (प्रतिनिधी) –अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शेतकऱ्याचे शेतातील गोदामातून नित्याचे वापरायचे लोखंडी शेती साहीत्य अज्ञात चोरट्याने नेल्याची घटना घडली.
पातोंडा येथील आत्माराम महादू देसले यांच्या शेतातील गोदमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चे टिलर व लोखंडी पाईप व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने ३० रोजी चोरून नेले अमळनेर पोलिसात भादवी ४६१,३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत