राजपूत समाजाच्या तरुणांनी शिक्षणातून प्रगतीची वाटचाल करावी-आ.किशोर पाटील
अमळनेरात राजपूत एकता मंच च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण..अमळनेर-शिक्षण हा एकमेव प्रगतीचा मार्ग असून याशिवाय पर्याय नाही यामुळे समस्त राजपूत समाजाच्या तरुणांनी शिक्षणाच्या प्रवाहातूनच प्रगतीची वाटचाल करावी असे आवाहन पाचोऱ्यांचे आं किशोर अप्पा पाटील यांनी अमळनेर येथे राजपूत एकता मंचच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळ्यात केले.तर आ सौ स्मिताताई वाघ यांनी राजपूत समाजासाठी सामाजिक सभाग्रृह तर आ शिरीष चौधरी यांनी शहरात छत्रपती शिवरायांप्रमाणेच भव्य अश्वारूढ महाराणा प्रतापांचा पुतळा उभारण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले.
अन्नपूर्णा मंगल कार्यालयात हा भव्य सोहळा पार पडला.सुरवातीला छत्रपती शिवराय,महाराणा प्रताप व विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ किशोर अप्पा पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून आ स्मिता वाघ,आ शिरीष चौधरी व मान्यवर उपस्थित होते,सर्वप्रथम खोकरपाट येथील रहिवासी तथा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सेंट्रल आर्म पोलीस फोर्स मध्ये असी कमांडन्ट पदी निवड झालेला रूपेशसिंग रमेश पाटील, साहाय्यक क्षेत्रीय अधिकारी पदी निवड झालेली शिरपूर तालुक्यातील बबळाज येथील मोहिनी योगेंद्रसिंग जाधव,नीट परीक्षेत उत्तम गुण मिळवून एमबीबीएस ला प्रवेश मिळविणारी कु योगिता अशोक शिंदे,खडतर परिस्थितीवर मात करून एसटीआय व आरटीओ परीक्षेत यश मिळविणारा स्वप्नील वानखेडे,एस आर पी मध्ये निवड झालेले योगेश यशवंत पाटील व विशाल राजेंद्र पाटील आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी रूपेशसिंग पाटील, कु मोहीनी जाधव,निकिता राजपूत, स्वप्नील वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले,यानंतर मान्यवरांच्या हस्ते पदवी,पदव्युत्तर तसेच दहावी बारावीत यश मिळविणाऱ्या सुमारे 90 गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पुढे बोलताना आ किशोर पाटील यांनी समाजकार्याची सुरुवात आधी घरापासून करावी असे सांगून विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी असल्यास सोडवण्याची ग्वाही दिली.आ स्मिता वाघ यांनी छत्रपती शिवराय आणि राणा प्रताप एका नाण्याच्या दोन बाजू असून या कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा असणे म्हणजे सामाजिक एकतेचे प्रतिक आहे,विद्यार्थ्यांनी एकतेचीच शिकवण घेऊन शिक्षणातून प्रगती साधावि अशी अपेक्षा व्यक्त करत सामाजिक सभागृहासाठी 10 लाख निधी देण्याची ग्वाही दिली.तर आ शिरीष चौधरी यांनी प्रत्येक घरात गुणवंत विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करून हिरा उद्योग समूहाच्या माध्यमातून रोजगार उपलब्दतेसाठी सुरु केलेल्या ई पब अँप चा लाभ घेण्याचे आवाहन केले.व महाराणाचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे स्वप्न पूर्णत्वास आणेल असे संकेत दिले.
कार्यक्रमास माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांनीही उपस्थिती देऊन शुभेच्छा दिल्या.त्यांनी महाराणा प्रताप चौकाचे सुशोभीकरण करून महाराणांच्या स्मारकाचे काम सुरु केल्याबद्दल राजपूत एकता मंचच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी मंचावर न प गटनेते प्रविण पाठक,जितेंद्र राजपूत,नरेंद्रसिंग ठाकूर,चांदूसिंग परदेशी,के ए पाटील,पंकज राजपूत,यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन विजयसिंग पवार यांनी केले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजपूत एकता मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठया संख्येने विद्यार्थी,महिला व पुरुष बांधव व पालक उपस्थित होते.