अमळनेर औषधी विक्रेता संघाचा बंद..
अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाचा बंद. या बंदमध्ये अमळनेर तालुका औषधी विक्रेता संघाने शंभर टक्के सहभाग नोंदवला. त्याप्रसंगी सकाळी अकरा वाजेला जीवन मेडिकल येथून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाची समारोप तहसील कार्यालयात तहसीलदार प्रदीप पाटील साहेबांना अमळनेर तालुका अमळनेर अखिल भारतीय औषधी विक्रेता संघातर्फे निवेदन देण्यात आले. बेकायदेशीरित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाइन औषधी विक्री व ई-पोर्टलबाबत शासन व प्रशासनाची सकारात्मक भूमिकेच्याविरोधात ऑनलाइन व्यवसायामुळे समाजात वाढ- ण्याच्या अपप्रवृत्तींच्या विरोधात.
या प्रसंगी अमळनेर तालुका औषधी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद डेरे तालुका पदाधिकारी तसेच जिल्हा सदस्य नरेंद्र पाटील,सुनील लोढा, सदानंद पाटील, राजेंद्र अग्रवाल, नितीन शहा,मुकेश शहा,सुनील लोढा प्रदीप पाटील,नरेंद्र शिंदे विजय ढवळे, प्रवीण माळी,अमोल पिंगळे,नीलेश पाटील,रमेश दहीफळे मुरलीधर चौधरी,अश्विनच्या शहा,रवींद्र चौधरी ,अल्ताफ शेखसगीर शेख, संजय पाटील व इतर विक्रेता संघ चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.