अमळनेरात ५ बालकांना डेंग्यू ची लागण..
अमळनेर– अमळनेर शहरात कसाली मोहल्ला व शिरुड नाका परिसरातील ५ बालकांना डेंग्यू ची लागण झाली असून कीटक नाशक फवारणीची मागणी होत आहे.
सप्तशृंगी कॉलोनी भागातील गौरव शीतल कोळी 6 वर्षे, आरीबा शेख बशीर ६ वर्षे रा कसाली मोहल्ला , कल्पेश पाटील १४ वर्षे रा शिव कॉलोनी, राहुल मोतीलाल शिंगाने १३ वर्षे रा पिंपळे रोड याना डेंग्यू ची लागण झाली असून ते डॉ विनोद पाटील यांच्या रुग्णालायत दाखल होते त्याच प्रमाणे सप्तशृंगी कॉलॉनितील अवघ्या १० महिन्याची बालिका आरुषी विलास पाटील हिला डेंग्यू झाल्याने धुळे येथे चिरंतन रुग्णालायत दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे तसेच डॉ नितीन पाटील यांच्या रुग्णालयात ही शिरुड नाका परिसरातील मोतीलाल पाटील यांचा मुलगा डेंग्यू ची लागण झाल्याने दाखल करण्यात आले आहे
नगरपालिकेने पावडर फवारणी तसेच कीटकनाशक फवारणी करण्याची मागणी होत आहे.
तातडीने या भागात फवारणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असून नागरिकांनी देखील काळजी पूर्वक पाण्याचे भांडे झाकून ठेवावेत आणि कोरडा दिवस पाळावा आणि बालकांची काळजी घेण्याचे आवाहन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आणि मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी संयुक्त रित्या केले आहे.