सोशल मीडियावर आदिवासी,तेली समाजाबद्दल अपशब्द वापणाऱ्या भदाणे नामक इसमावर फौजदारी दाखल करा.
आ.शिरीषदादा मित्र परिवार,तेली समाज व आदिवासी समाजाची निवेदनाद्वारे मागणी..अमळनेर(प्रतिनिधी )सोशल मिडियावर आदिवासी व तेली समाजाबद्दल जातीवाचक अपशब्द वापरण्याऱ्या निलेश भदाणे नामक इसमावर तिव्र स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आ शिरिषदादा चौधरी मित्र परिवार तसेच तेली समाज, व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने अमळनेर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद केले आहे की फेसबुक व अन्य सोशल मीडियावरती कट्टर क्षत्रिय मराठा या नावाचे अकाउंट वापरणाऱ्या निलेश भदाणे नामक इसमाने आदिवासी व मागास समाज बांधवांच्या भावना दुखावतील व जाती जातीत सामाजिक तेढ निर्माण होईल असे पोस्ट तयार करून त्या सर्वत्र पसरविण्याचे काम केले आहे. सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने निलेश भदाणे याचेवर पोलिसां मार्फत तात्काळ गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा नोंदवून त्यास त्वरित अटक व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अमळनेर पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.एस. चव्हाण यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी निवेदन देतांना गटनेते प्रवीण पाठक, श्रीराम चौधरी, किरण गोसावी, नगरसेवक नरेंद्र चौधरी, महेश जाधव, भरत पवार, अनिल महाजन, सुनील भामरे, पंकज चौधरी, संतोष पाटील, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य सदस्य आनंद शंकर पवार, सरपंच सुनील सोनवणे, सरपंच अमोदा राजेंद्र पाळधी, सरपंच तासखेडा चेतन ठाकूर, महेंद्र पवार, सुभाष मोरे, योगेश सोनवणे, हंसराज मोरे, पराग चौधरी, गणेश चौधरी, शिवाजी चौधरी, चेतन चौधरी, कमलेश चौधरी, संतोष चौधरी, दिनेश करनकाळ, कुणाल चौधरी, पारस धाप, गजानन चौधरी, यासह आ शिरीषदादा मित्र परिवाराचे कार्यकर्ते, आदिवासी एकता परिषद व तेली समाज बांधव उपस्थित होते.