महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघ जिल्हा कार्याध्यक्षपदी दिनेश साळुंखे यांची बिनविरोध निवड..
अमळनेर -अमळनेर येथील ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष दिनेश वासुदेव सांळूखे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ (डी.एन.ई.१३२) च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी राज्य उपाध्यक्ष श्रीमती प्रतिभा सुर्वे व जिल्हाध्यक्ष मंगेश बाविस्कर यांनी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडी बद्दल उपाध्यक्ष संजय शिंदे,महिला उपाध्यक्ष शैलजा पाटील, सचिव सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष संजय सूर्यवंशी,सहसचिव राजू सोनवणे,महेंद्र मोरे, एम.बी.खरारे, संघटन प्रमुख दिनेश देशमुख, योगेश तायडे, अशोक सोनवणे महिला आघाडीच्या रेखा तायडे, छाया पाटील तसेच प्रसिद्ध प्रमुख नयन गोहिल,किशोर जावे,जितेंद्र पवार प्रमुख सल्लागार सतीष शिसोदे,डॉ चंद्रकांत हलगे, विलास बोंडे व ग्रामसेवक संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष नाशिक संजय पाटील, जिल्हाध्यक्ष संजीव निकम सचिव संजीव भारंबे प्रसिद्धि प्रमुख भरत तायडे ता.अध्यक्ष मुक्ताईनगर संतोष सपकाळे, ग्रामसेवक आधार धनगर, नितिन पाटील, अमळनेर ता.अध्यक्ष संजय पाटील आदिनी अभिनंदन केले आहे.