Breaking

मजबूत झालेल्या संघटनेच्या बळावर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपा बहुमताने जिंकणार-जिल्हाध्यक्ष उदय वाघ

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

सडावण येथे बूथ कार्यकर्ता मेळाव्यास प्रतिसाद,विविध विकास कामाचे लोकार्पण व उदघाटन.अमळनेर-(प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यात भाजपने बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व गटप्रमुख अशी त्रिस्तरीय रचना करून मजबूत व कधीही दुभंगणार नाही अशी तटबंदी निर्माण केली आहे,व याच बळावर जळगाव जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभेच्या जागा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्वाधिक मताधिक्याने जिंकू असा विश्वास भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सडावण येथे जानवे शिरुड जि.प.गटाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चा बूथ मेळावा, सडावण येथे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार सौ स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पडला.यावेळी सडावण येथे खा.ए.टी.पाटील यांच्या निधीतून झालेल्या व्यायाम शाळेचे लोकार्पण तसेच आ सौ स्मिता वाघ यांच्या माध्यमातून २५/१५ योजनेतर्गत समाजीक सभागृह व गाव दरवाजाचे भूमिपूजन उदय वाघ व स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच बूथ मेळाव्यात नागेश्वर महादेव मंदिर परिसरातील जवळपास ३५ युवकांनी जाहीररीत्या भाजपात प्रवेश करून आगामी २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षकार्य तसेच सरकारच्या योजना घरोघरी जनतेपर्यंत पोहचविण्याचा संकल्प केला.आ सौ वाघ यांनी आपल्या मनोगतात आज राज्य आणि देशाला भाजपा हाच एकमेव सक्षम पर्याय असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष उदय वाघ म्हणाले की जिल्हा भाजपने ९२ बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवले असून यापैकी ७० मेळावे पूर्ण झाले आहेत,सर्व मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे,काँग्रेस राष्ट्रवादी हि दुबती नय्या असून या पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या हातून महापालिका व जि प गेल्याने पक्षात मरगळ येऊन कार्यकर्ते निस्तेज झाले आहेत,याउलट भाजपा कार्यकर्ते फार्मात आहेत,भाजपने पूर्वी वापरलेल्या वन बूथ टेन युथ यासंकल्पनेची विरोधी पक्ष कॉपी करीत असून भाजप आता वन बूथ थर्टी युथ संकल्पना राबविण्याची ताकद ठेवत आहे,जळगाव जिल्ह्यात भाजपाने जि.प.,प.स.,न.पा.,महापालिका, व ग्रा. प.आदी सर्व निवडणुकांमध्ये उज्वल कामगिरी दाखवून आपले नंबर एक चे अस्तित्व सिद्ध केले आहे.यामुळे पुढील निवडणुकातही भाजपाच अव्वल ठरेल असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.याप्रसंगी जि.प.चे शिक्षण सभापती पोपट भोळे, पं.स.सभापती वजाबाई भिल,जि.प.सदस्य सोनू पवार प.स.उपसभापती शाम अहिरे जिल्हा चिटणीस महेश पाटील,तालुका अध्यक्ष बाळासाहेब जिवन पाटील कामराज पाटील, प्रफुल पवार,निवास मोरे, मा.जी. प.सदस्य संदीप पाटील, पारोळाचे नगरसेवक धीरज महाजन प.स.सदस्य रेखाबाई पाटील ,सरचिटणीस हिरालाल पाटील, जिजाबराव पाटील,लोकसभा विस्तारक सचिन पान पाटील अमळनेर विधानसभा विस्तारक दीपक पवार, सडावण सरपंच रत्नाबाई उपसरपंच गुलाब पाटील जिजाबराव पाटील, महिला तालुकाध्यक्ष संगीता पाटील, नाटेश्वर पाटील,दौलत सोनवणे, रावसाहेब पाटील,जितू पाटील सरपंच फाफोरे प्रकाश फाफोरे राजू फाफोरेकर, योगेश पाटील मा.सरपंच पिंपळे, नवल पाटील,जानवे शिरूड गट प्रमुख राजेश वाघ, सात्री सरपंच महेंद्र बोरसे, पाडळसरे सचिन पाटील,कळमसरे सरपंच मुरलीधर महाजन, जानवे सरपंच विजू भिल, डांगर बु. सरपंच गुलाब पाटील, निसर्डी उपसरपंच काशिनाथ पाटील,खडके उपाध्यश भाजप मच्छिंद्र पाटील, वाघोदे उपसरपंच कीर्तीलाल पाटील, अंचलवाडी सरपंच गोपाल पाटील, लोंढवे सरपंच कैलास खैरनार रणाईचे सोसायटी चेअरमन संजुबाबा, गलवाडे चंद्रकांत पाटील, कोंढावळ,.सरपंच रविंद्र पाटील,कावपिंप्री सुनिल पाटील,इंदापिंप्री सुनील पाटील,बिलखेडा एम.आर.पाटील,हेडावे सरपंच दिलबर भिल,विकास सोसायटी चेअरमन भास्कर पाटील, बापु पाटील, रडावन सरपंच कमलाकर पाटील,एकरुखी भैय्या पाटील, ढेकु खु दगाजी जीभाऊ, नितीन पाटील,आबारे खापरखेडा सरपंच सतिष पाटील,बहाद्दर पूर सरपंच संजय पाटील,कळमसरे शिवाजी राजपुत यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??