अमळनेर मारवड पोलीसांचे अवैध धंद्याविरोधात धाडसत्र..
चार आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
(प्रतिनिधी) मारवड येथुन जवळच असलेल्या हिंगोणेसीम, सात्री व लोण बुद्रुक येथे गावठी हातभट्टीची दारू निर्मीती व विक्री होत असल्याबाबत तर जैतपीर येथे मटका खेळविला जात असल्याबाबत मारवड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीसांनी दिनांक १३ रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी व काल १४ रोजी असे दोन दिवसभर राबविलेल्या धाडसत्रात उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख यांचे मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी स्वत आपले पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश शेमळे, सहाय्यक फौजदार भागवत पाटील, पोलीस नाईक सुनिल अगोने, फिरोज बागवान, संजय पाटील, संजय बोरसे यांचे पथकाने हिंगोणे सीम येथुन ७०० रूपयांची २० लिटर गावठी दारूचा भरलेला कॅनसह ५० लिटरचे ४ प्लॅस्टिक कॅनमधील २०० लिटर दारू निर्मितीचे रसायन मिळुन एकुण ५२०० रूपयांचे साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस नाईक सुनिल अगोने याच्या फिर्यादीवरून सुभाष गजमल पवार रा. हिंगोणेसीम ता. अमळनेर याचे विरूद्ध मारवड पोलीस ठाण्यात मुंबई प्रोव्हिशनल अॅक्ट ६५ फ, क, ई, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भागवत पाटील करित आहेत.
तसेच लोण बुद्रुक येथील संजय जगन्नाथ भिल्ल हा गावठी रारू विक्री करतांना पोलिसांना रंगेहाथ आढळून आल्याने त्याचे जवळुन कॅनसह ३५ लिटर ९०० रूपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे तर सात्री येथील दिपक सूकलाल भिल्ल हा घरी गावठी हातभट्टीची दारू विकतांना आढळून आल्याने त्याचे जवळुन ३० लिटर ६०० रूपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली असून त्याचे विरूद्ध पोलीस नाईक संजय बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात्री व लोण बुद्रुक येथील दोन्ही आरोपींविरुद्ध मूबंई दारू बंदी कायदा ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सात्रीचा तपास सहायक फौजदार श्रीराम पाटील व लोण बुद्रुक येथील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश चव्हाण करित आहेत. तसेच जैतपीर येथील निंबाचा झाडाखाली महेंद्र पंडित पाटील हा कल्याण मटका नावाचा जुगार खेळवितांना आढळून आल्याने त्याचे जवळुन ४९० रूपये रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्याचे विरूद्ध नामदेव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात मुंबई कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक सचिन निकम करित आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना पोलीस ठाण्यात हजर होऊन आठवडा ओलांडताच गणेश उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून अवैध धंद्याविरोधात सलग दोन दिवस धाडसत्र राबविल्याने पाडळसरे, मारवड परिसरातील अवैध व्यवसायीकांचे धाबे दनालेले असून नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहेत.