लोंढवे येथील स्व.आबासो.एस्.एस्.पाटील माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.
लोंढवे,(ता.अमलनेर)येथील स्व.आबासो. एस्.एस्.पाटिल माध्य.विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा. आयोजित कार्यक्रम अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बालासाहेब पाटिल होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरवात झाली.प्रास्ताविक हिंदी विषय शिक्षक श्री. दीपक पवार यांनी तर, हिंदी भाषेचे महत्व श्री. मनोहर देसल यांनी सांगीतले. विद्यालयातील एकूण २० विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात हिंदी दिवसाचे अवचित्य साधून पंचायत समिति(शिक्षण विभाग),अमलनेर तालुका हिंदी शिक्षक मंडल व यूनियन बँक शाखा-अमलनेर आयोजित “मातृभाषा-मराठी और राष्ट्रभाषा-हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेत” विद्यालय स्तरावर लहान गटातून प्रथम-दिनेश शिवाजी पाटिल (इ.७वी), मोठ्या गटातून
संजीवनी विजय वाघ(इ.१०वी),रोहित गुलाब खैरनार(इ.९वी)यानसह विद्यालय स्तरावर इ.५वी ते१०वी तील प्रत्येक वर्गातून 3 विद्यार्थ्याना शालेय उपयोगी वस्तु बक्षिस म्हणून शिक्षकाच्या हस्ते देण्यात आल्या. आपल्या अध्यक्षिय भाषणात भारता देशाला जाणून घेण्यासाठी हिंदी अवगत असणे गरजेचे आहे असे विषद केले.सुंत्रसंचलन व आभार इ.९वी तील कु.दिव्या रामलाल सुर्यवंशी व कु.प्रतिक्षा विलास पाटिल यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृद उपस्थित होते तर, शिक्षकेत्तर वृद यांनी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रयत्न केले.