‘हिंद दी चादर’कार्यक्रमाच्या प्रचार प्रसाराकरीता जालना येथे महारॅलीचे आयोजन
By तेजराव दांडगे

‘हिंद दी चादर’कार्यक्रमाच्या प्रचार प्रसाराकरीता जालना येथे महारॅलीचे आयोजन
- श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन
जालना, दि.20 : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील भाविकांना नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या महासोहळ्यात शीख, सिकलीगर, बंजारा,लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाज आदी समाजासह इतर समाजातील सुमारे 9 ते 10 लाख भाविक सहभागी होणार आहेत.
जालना जिल्ह्यात या ऐतिहासिक कार्यक्रमाचा विविध माध्यमातून मोठ्या प्रमाण प्रचार प्रसार करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागामार्फत दि. 21 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 8 वाजता गांधी चमन ते शिवाजी चौक महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीत जालना शहरातील 21 शाळेतील सुमारे 5 हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध समाज घटकातील प्रतिनीधी-भाविक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, नागरिक सहभागी होणार आहेत. या भव्य महारॅलीत जालनाकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकरी आशिमा मित्तल यांनी केले आहे.


