शिवनगरी जळगाव सपकाळ येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची निवड
By गोकुळ सपकाळ

शिवनगरी जळगाव सपकाळ येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची निवड
भोकरदन तालुक्यातील शिवनगरी जळगाव सपकाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२६ साठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. यावेळी उत्सवाच्या चार दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषाही निश्चित करण्यात आली.
नवीन समितीत अध्यक्षपदी कृष्णा गंगाधर सपकाळ, उपाध्यक्षपदी रामेश्वर भास्कर सपकाळ (हातोडे टेलर), सचिवपदी अमोल माणिकराव सपकाळ, सहसचिवपदी गजानन नवल, कार्याध्यक्षपदी प्रदीप पा. नेमाने, कोषाध्यक्षपदी राजू बेलोकर, सहकोषाध्यक्षपदी रामेश्वर दौड तर खजिनदारपदी अमोल पप्पू भाऊ सपकाळ यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागार म्हणून प्रशांत बुरकुले व विष्णू सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचीही उपस्थिती व सहकार्य लाभणार आहे.
यावेळी शिवजयंती उत्सव चार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामध्ये कीर्तन, शाळकरी मुलांचे नृत्य सादरीकरण, प्रबोधनपर व्याख्याने व भारूड अशा विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवरायांचे विचार, शौर्य व सामाजिक एकोपा जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आखण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या निवडप्रसंगी केतन साळवे, रमेश शेठ सपकाळ, जी. एस. सपकाळ, आर. ए. सपकाळ, गोकुळ सपकाळ, गणेश सपकाळ यांची उपस्थिती होती. गावात यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात व ऐतिहासिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



