जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहळाई येथे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
By गौतम वाघ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहळाई येथे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
मोहळाई (ता. भोकरदन, जि. जालना) :आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहळाई येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
या निमित्ताने शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन कु. ईश्वरी पालकर हिने अत्यंत आत्मविश्वासाने केले. या कार्यक्रमात कु. आशा शिंदे, प्रतीक्षा शिंदे, वेदिका पालकर, शिवानी पालकर, पायल पालकर व नम्रता काकडे यांनी प्रभावी भाषणे सादर केली.
विद्यार्थिनींनी आपल्या भाषणांतून राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार, संगोपन व स्वराज्यनिर्मितीमागील त्यांचे महान कार्य यावर प्रकाश टाकला. तसेच स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर केलेला प्रचार व प्रसार याबाबत मार्गदर्शनपर विचार मांडले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर पालकर व उपाध्यक्ष दादाराव पालकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सदस्य ज्ञानेश्वर बेंडे, गौतम वाघ, श्रीमती नीलम योगेश शिंदे, श्रीमती मीरा भगवान परनकर, संदीप भिका पालकर, हमीद शहा, श्रीमती सीमा प्रमोद सपकाळ, तानाजी मुळे, श्रीमती पूनम मगर व भगवान मुळे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल देविदासराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक गजानन बोरसे, आत्माराम पोटे व गजानन सूर्यवंशी यांनी केले.



