पदमावती येथे पाणीपुरवठा विहिरीवर वाद; सरपंचांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल
By तेजराव दांडगे

पदमावती येथे पाणीपुरवठा विहिरीवर वाद; सरपंचांना शिवीगाळ व धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल
पारध, दि. २८ (जालना): भोकरदन तालुक्यातील पदमावती येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीवरील मोटार बंद करण्याच्या कारणावरून वाद होऊन सरपंच पतीला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात आरोपीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पदमावती येथील सरपंच पती अंबादास रामदास पवार (वय ४५) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास गावातील पाणीपुरवठा विहिरीजवळ ही घटना घडली.
नेमकी घटना काय?
फिर्यादी अंबादास पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील रहिवासी आरोपीत गोविंद हरी गुजर याने मद्यधुंद अवस्थेत विनाकारण सार्वजनिक पाणीपुरवठ्याची मोटार बंद केली. जेव्हा फिर्यादींनी याबाबात विचारणा केली, तेव्हा आरोपीताने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, आरोपीताने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पोलीस कारवाई
या प्रकरणी पारध पोलिसांनी तातडीने दखल घेत आरोपीताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३१९/२०२५ नुसार दाखल केला आहे.
तपास अधिकारी: सपोनी संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश सिनकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नोंद: सफौ. दांडगे यांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे.
सार्वजनिक मालमत्तेशी छेडछाड आणि लोकप्रतिनिधीला दिलेल्या धमकीमुळे गावात या घटनेची चर्चा सुरू आहे.



