समाजमाध्यमांचा वापर करा पण त्याचे गुलाम बनू नका – जेष्ठ पत्रकार यांचा एन.एन.एस.शिबिरातून सल्ला
By तेजराव दांडगे

समाजमाध्यमांचा वापर करा पण त्याचे गुलाम बनू नका – जेष्ठ पत्रकार यांचा एन.एन.एस.शिबिरातून सल्ला
पारध (प्रतिनिधी) समाजमाध्यमे आता समाजाचे अविभाज्य घटक बनले आहे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आज समाजमाध्यमांवर सक्रीय असलेले दिसतात मात्र या समाज माध्यमांचा योग्य वापर केल्यास ठीक अयोग्य वापर झाल्यास आपण उध्वस्त होऊ शकतो.त्यामुळे समाज माध्यमांचा योग्य वापर करा त्याचे गुलाम बनू नका असा सल्ला मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवी लोखंडे यांनी पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलतानात राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात शिबिरार्थीना दिला.
भोकरदन तालुक्यातील पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ .संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रा. से. यो.विभागाचे विशेष श्रमदान शिबीर दि.२३ ते २९ डिसेंबर दरम्यान सुरू असून या शिबिरादरम्यान शनिवार (दि.२७)रोजी बौद्धिक दुपारी दोन ते चार यावेळेतील बौद्धिक सत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य अमोल बांडगे यांच्या अध्यक्षतेखाली तथा कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र पानपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार रवी लोखंडे यांचे ’सोशल मीडिया युवकांची संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजचा युवक हा डिजिटल युगात वाढलेला आहे,सोशल मीडिया म्हणजे फक्त टाइमपास नाही, तर संधींचे दार योग्य वापर केला तर सोशल मीडिया आयुष्य घडवू शकतो, चुकीचा वापर केला तर आयुष्य बिघडवूही शकतो.
संवाद आणि माहिती शेअर करण्याचे डिजिटल माध्यम हे प्लॅटफॉर्म युवकांसाठी शिकणे, कमावणे आणि ओळख निर्माण करणे यासाठी उपयोगी पडू शकतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.सोशल मीडिया ही संधी आहे, संकट नाही आजचा युवक जर शहाणपणाने वापर करेल तर उद्याचा भारत डिजिटलदृष्ट्या सक्षम बनेल“सोशल मीडिया वापरा, पण स्वतःला हरवू नका” असा प्रामाणिक सल्ला देखील रवी लोखंडे यांनी उपस्थित शिबिरार्थींना दिला.यावेळी जवळपास १७६ शिबिरार्थी शिबिराला उपस्थित होते.




