न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन भोवले: वॉरंटवरील आरोपीताला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
(By तेजराव दांडगे) जालना: पारध (ता. भोकरदन) पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन भोवले: वॉरंटवरील आरोपीताला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
जालना: पारध (ता. भोकरदन) पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई
पारध, दि. ०५ : न्यायालयाच्या तारखेस वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे जारी करण्यात आलेल्या वॉरंटनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीताला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलीस स्टेशन पारध (ता. भोकरदन) येथे दाखल असलेल्या गुन्हा क्र. 246/22 मधील आरोपीत सचिन कैलास लकस (वय ३१ वर्षे, रा. पारध खुर्द, ता. भोकरदन, जि. जालना) हा न्यायालयीन तारखेस सातत्याने गैरहजर राहत होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट (Non-Bailable Warrant – NBW) जारी केले होते.
न्यायालयीन वॉरंटनुसार पारध पोलिसांनी आरोपीत सचिन लक्कस याला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केले.
सुनावणीदरम्यान, आरोपीत सतत न्यायालयासमोर गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. न्यायालयाने आरोपीत सचिन कैलास लकस याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे.



