पहाटेची धडक! पारध पोलिसांची तिसऱ्या दिवशीही ‘अवैध तस्करी’वर ‘हॅट्ट्रिक’!
(By तेजराव दांडगे) पारध पोलिसांची 'जागरूक' हॅट्ट्रिक! पहाटेच्या अंधारात अल्टोतून १२० किलो गोवंश मांस तस्करीचा डाव उधळला; दोन आरोपीत जेरबंद, २.४० लाखांचा मुद्देमाल जप्त, पहाटेच्या थंडीतही पारध पोलीस 'ऑन ड्युटी'!

🚨 पहाटेची धडक! पारध पोलिसांची तिसऱ्या दिवशीही ‘अवैध तस्करी’वर ‘हॅट्ट्रिक’!
पारध पोलिसांची ‘जागरूक’ हॅट्ट्रिक! पहाटेच्या अंधारात अल्टोतून १२० किलो गोवंश मांस तस्करीचा डाव उधळला; दोन आरोपी जेरबंद, २.४० लाखांचा मुद्देमाल जप्त,
पहाटेच्या थंडीतही पारध पोलीस ‘ऑन ड्युटी’!
पारध, दि. ३०: जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशनने अवैध धंद्यांविरुद्ध सुरू ठेवलेल्या धडक कारवाईची मालिका खंडित झालेली नाही. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या दिवशीही पारध पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत मोठी कारवाई करत, गोवंश मांस तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
पारध पोलिसांच्या या ‘जागरूक’ हॅट्ट्रिकमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
घटनेचा तपशील:
आज, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ५.५० वाजेच्या सुमारास, अजिंठा ते बुलढाणा जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वालसावंगी फाट्याजवळ पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपासणी मोहीम राबवली.
• या तपासणीदरम्यान, पोलिसांनी एमएच १२ डीएम ३८१९ क्रमांकाची मारुती सुझुकी अल्टो कार थांबवली.
• या कारची तपासणी केली असता, त्यामध्ये १२० किलो वजनाचे गोवंश जातीचे मांस अवैध व विनापरवाना विक्रीसाठी वाहतूक केले जात असल्याचे उघड झाले.
• पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींतांना ताब्यात घेतले.
आरोपीत व मुद्देमाल:
पोलीस कर्मचारी संतोष गुलाबराव जाधव यांच्या फिर्यादीवरून पारध पोलिसांनी तोफीक खलील कुरेशी (रा. शिवणा) आणि शेख आझम शेख कादर (रा. मोताळा) या दोन आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
१) गोवंश जातीचे मांस (१२० किलो) ₹ ६०,०००/-
२) मारुती अल्टो कार (एमएच १२ डीएम ३८१९) | ₹ १,८०,०००/-
एकूण किंमत ₹ २,४०,०००/-
सपोनि संतोष माने यांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५(c) आणि ९ सह भा. न्या. सं. (BNS-2023) च्या संबंधित कलमांन्वये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
पुढील तपास एएसआय/१२४४ जायभाये हे करीत आहेत. पारध पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशी केलेल्या या प्रभावी कारवाईमुळे प्रशासकीय दक्षता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.



