जालना: रामनगर साखर कारखाना जवळील ‘साईच्छा हॉटेल’वर छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ४ आरोपीत जेरबंद, ३ महिलांची सुटका!
By तेजराव दांडगे

जालना: रामनगर साखर कारखाना जवळील ‘साईच्छा हॉटेल’वर छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ४ आरोपीत जेरबंद, ३ महिलांची सुटका!
जालना, दि. २६ नोव्हेंबर २०२५: जालना पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) केलेल्या धडाकेबाज कारवाईत जालना ते मंठा रोडवरील रामनगर साखर कारखाना जवळील ‘साईच्छा हॉटेल’वर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दि. २५/११/२०२५ रोजी केलेल्या या कारवाईत हॉटेल मालकासह एकूण ४ आरोपीतांना अटक करण्यात आली असून, ३ पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
गुप्त माहिती आणि यशस्वी छापा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, ‘साईच्छा हॉटेल’चा मालक सुधाकर यादव हा आर्थिक फायद्यासाठी हॉटेलच्या लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि स्थागुशाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली AHTU चे प्रभारी अधिकारी व त्यांच्या पथकाने तत्काळ मिळालेल्या माहितीच्या आधारावर हॉटेलवर छापा टाकला.
आरोपीत आणि जप्त मुद्देमाल
छापा टाकल्यावर, हॉटेल साईच्छामध्ये खालील आरोपीत आणि ३ पीडित महिला मिळून आले:
१) सुधाकर यादव (साईच्छा हॉटेलचा मालक), २) इश्वर बबनराव गायकवाड (मॅनेजर, रा. सरस्वती मंदिर, खरपुडी रोड, जालना), ३) पंडीत काळु राठोड (रा. ममदाबाद तांडा, जालना), ४) अक्षय एकनाथ बुरकुल (रा. पारेगाव रामनगर साखर कारखाना, जालना)
या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम ४०,१२०/- रुपये इतका मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हा दाखल
अटक केलेल्या आरोपीतांविरुद्ध मौजपुरी पोलीस स्टेशनमध्ये ‘महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६’ च्या कलम ३, ४, ५, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर आर.टी. रेंगे, आणि पोलीस निरीक्षक पंकज जाधव (स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोउपनि गणेश शिंदे (प्रभारी अधिकारी AHTU), पोउपनि संजय गवळी, सपोउपनि एम.बी. वाघ (मौजपुरी पो. स्टे), पोहेकॉ कृष्णा देठे, पोहेकॉ सतीश गोफणे, महिला अंमलदार संगिता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड, आणि चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांचा समावेश होता.




