अंबड तालुक्यातील देशगव्हाण येथे जनावरांसाठी मोफत ‘वंधत्व निवारण शिबीर’ यशस्वी
By देवानंद बोर्डे

अंबड तालुक्यातील देशगव्हाण येथे जनावरांसाठी मोफत ‘वंधत्व निवारण शिबीर’ यशस्वी
अंबड, जालना: महाराष्ट्र शासनाच्या विदर्भ-मराठवाडा विकास कार्यक्रम (टप्पा २) अंतर्गत मौजे देशगव्हाण (ता. अंबड, जि. जालना) येथे पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ‘वंधत्व निवारण शिबीर’ नुकतेच उत्साहात पार पडले.
या शिबिराचा मुख्य उद्देश: पशुधनातील वंध्यत्व समस्येवर वेळीच उपचार करून दुग्धोत्पादन आणि पशुधनाची वाढ वाढवणे हा होता.
शिबिरातील महत्त्वाचे कार्य:
१) शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वंध्यत्वग्रस्त जनावरांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत उपचार केले.
२) पशुपालकांना जनावरांचे आरोग्य, आहार व्यवस्थापन आणि वंधत्व निवारणाबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित मान्यवर व तज्ज्ञ:
जालना जिल्ह्यातील विषय तज्ज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले. यात प्रामुख्याने डॉ. अक्षय, डॉ. नागनाथ गायकवाड, डॉ. वाघ आणि मुकेश सहारे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
या महत्त्वपूर्ण शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा विकास कार्यक्रम यशस्वी झाला.




