जालन्यात गोमास तस्करीचा प्रयत्न उधळला! पारध पोलिसांची धाडसी कारवाई; १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
शिवना-धावडा रोडवर सापळा रचून आरोपीताला अटक; मांस व पिकअप व्हॅन हस्तगत

जालन्यात गोमास तस्करीचा प्रयत्न उधळला! पारध पोलिसांची धाडसी कारवाई; १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
शिवना-धावडा रोडवर सापळा रचून आरोपीताला अटक; मांस व पिकअप व्हॅन हस्तगत
पारध (Paradh), दि. १६: जालना जिल्ह्यातील पारध पोलिसांनी गोमास तस्करीच्या प्रयत्नाला आज मोठा झटका दिला आहे. शिवना (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथून धावडा व वालसावंगी येथे विक्रीसाठी आणले जात असलेले ३० किलो गोमास आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पिकअप व्हॅन जप्त करत, एका आरोपीताला अटक करण्यात आली आहे.
आज (दि. १६) सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना गुप्त माहिती मिळाली होती की, शिवना येथून धावडा आणि वालसावंगी गावाच्या दिशेने गोमास विक्रीसाठी आणले जात आहे. या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी तात्काळ शिवना-धावडा रोडवर सापळा रचला.
पोलिसांनी संशयास्पद हालचाल दिसताच, इरफान शब्बीर कुरेशी (रा. शिवना, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या आरोपीताला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, त्याच्याजवळ ३० किलो गोमास (किंमत अंदाजे ६,००० रुपये) आणि गोमास वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पिकअप व्हॅन (एमएच ०४ ईबी ७८१९) (किंमत अंदाजे १,००,००० रुपये) असा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदर आरोपीताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, (Additional SP Aayush Nopani ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलीस स्टेशनचे एपीआय माने (API Santosh Mane), एएसआय जयभाये (ASI Jaybhaye), पीसी सुनील जाधव, पीसी फोलाणे आणि पीसी संतोष जाधव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.