मानवाधिकार हा जगातील प्रत्येक मानवाला जन्मजात व निसर्गतः आपोआप मिळणारा अधिकार असून कुणीही, तो हिरावून घेवू शकत नाही किंवा त्यांचे हनन करू शकत नाही! – डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट
By अनिल जाधव

मानवाधिकार हा जगातील प्रत्येक मानवाला जन्मजात व निसर्गतः आपोआप मिळणारा अधिकार असून कुणीही, तो हिरावून घेवू शकत नाही किंवा त्यांचे हनन करू शकत नाही! – डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट
नागपूर – नुकताच येथील स्थानिक रवि भवन सभागृहामध्ये दि. १०-१०-२०२५ रोजी केंद्रीय मानवाधिकार वृत्तपत्र समूह स्थापना दिवस समारोह सोहळा केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा सामाजिक क्षेत्रातील सहा ते सात दशकांच्या निस्पृह सेवाभावी कार्यास्तव साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. मिलींद दहिवाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सबंध भारतामधून विविध प्रांतातून या निमित्ताने हजर झालेल्या शेकडो कें. मा. सं. पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या सान्निध्यात हर्षोल्ल्हासात संपन्न झाले. त्यावेळी आपल्या अध्यक्षीय प्रभावी भाषणातून मानवाधिकार संदर्भात आपले विचार व्यक्त करतांना डॉ. कस्तुरे यांनी वरील विधान केले.
याप्रसंगी डॉ. गणेश वसंत मुळे, संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, नागपूर व अमरावती विभाग, मा. विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर, मा. प्रकाश भागवत, सिने अभिनेता व दिग्दर्शक, हास्य जत्रा, येड्याची जत्रा, मुंबई, मा. श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर योगेश्वरानंद गिरी महाराज, मुंबई, एस्. एस्. एस्. असोसिएट्स् , नागपूर, सहायक पोलीस आयुक्त, नागपूर मा. अशोक शेळके, कें. मा. सं. चे राष्ट्रीय सचिव डॉ. बबनराव महामुने, डॉ. डी. व्ही. खरात, बुलढाणा जिल्हा कें. मा. सं. अध्यक्ष यांच्यासह मा. बशीर शेख, महा. पदाधिकारी, मा. अंकुश पडघान व इतर बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. मिलिंद दहिवले यांनी संगठन च्या आजवरच्या विधायक कार्याची व भविष्यातील नियोजित संयोजना बाबतची सविस्तर माहिती सर्वांना देवून मानवाधिकार संरक्षण व संवर्धनाचे कार्य हे पवित्र कार्य असून प्रत्येकाने त्यासाठी वाहून घेतले पाहिजे असे आवाहन केले.
या समारंभाच्या निमित्ताने देशभरातील अनेक सामाजिक तथा इतरही विविध क्षेत्रात समाज सेवा व प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले. तसेच सुप्रसिध्द शास्त्रीय नृत्य विशारद कलावंत प्रा. प्रियदर्शन सोनटक्के यांच्या नृत्यासह प्रासंगिक गीतसंगीत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच डॉ. कस्तुरे यांच्या मानवीय संदेश देणाऱ्या कवितांचे व गीतांचे सादरीकरण सुध्दा करण्यात आले.