पारध पोलिसांची अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई; ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
एका मोटारसायकलसह दोन आरोपीतांकडून देशी दारूच्या ७० बाटल्या हस्तगत

पारध पोलिसांची अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई; ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
एका मोटारसायकलसह दोन आरोपीतांकडून देशी दारूच्या ७० बाटल्या हस्तगत
जालना| पारध (Paradh), दि. १५: पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांवर कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपीतांकडून एकूण ७५ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पारध पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली.
कारवाईचा तपशील:
१) पहिला आरोपीत: रईस बुरा तडवी (रा. पारध) याच्याकडून ४८ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या (किंमत अंदाजे २,८८० रुपये) जप्त करण्यात आल्या.
१) दुसरा आरोपीत: अमोल उत्तम बर्डे (रा. पिंपळगाव रे) याच्याकडून २२ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या (किंमत अंदाजे २,२०० रुपये) आणि ७०,००० रुपये किमतीची एक मोटारसायकल असा एकूण ७२,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपीतांकडून मिळून एकूण ७५,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्यावर गुन्हा क्र. २५७/२५ आणि २५८/२५ नुसार कलम ६५ (इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष द. माने यांच्या नेतृत्वाखाली पीसी संतोष जाधव, पीसी भगवान जाधव आणि पीसी सुनील जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.