आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पारध येथे स्वच्छता मोहीम, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
By तेजराव दांडगे

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पारध येथे स्वच्छता मोहीम, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
पारध (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ मोहिमेअंतर्गत, भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत महर्षी पराशर महाराजांचे मंदिर परिसर आणि आरोग्य उपकेंद्र स्वच्छ करण्यात आले.
या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी सभापती परमेश्वर लोखंडे, माजी सरपंच गणेश लोखंडे, दामोदर अल्हाट, सुरेश अल्हाट, नितीन लोखंडे, पवन लोखंडे, सुनील बापू देशमुख, विकास लोखंडे, देवेंद्र लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
या सामूहिक प्रयत्नामुळे गावातील महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण स्वच्छ झाले, ज्यामुळे स्वच्छता राखण्याबाबत समाजात सकारात्मक संदेश गेला.