कोसगाव येथे ‘मुख्यमंत्री स्वच्छता झाडू-फावडा-टोपली’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी - गौतम वाघ

कोसगाव येथे ‘मुख्यमंत्री स्वच्छता झाडू-फावडा-टोपली’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोसगाव (भोकरदन), दि. 23 सप्टेंबर: भोकरदन तालुक्यातील कोसगाव ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत गावात ‘स्वच्छता झाडू-फावडा-टोपली’ मोहीम यशस्वीपणे राबवली. या अभियानात स्वच्छता आणि वृक्षारोपणाला विशेष प्राधान्य देण्यात आले.
या उपक्रमात गावातील नागरिक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. ‘स्वच्छता हीच सेवा’, ‘हरित गाव, स्वच्छ गाव’ यांसारख्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारून गेले.
या अभियानामुळे गावात सामाजिक ऐक्य वाढले असून, पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश पसरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच, या उपक्रमाने गावाच्या विकासात्मक कार्यांना नवी दिशा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच राधाबाई शिंदे, चेअरमन सुभाष शेळके, तलाठी मीनल मेश्राम, ग्रामसेवक गवई मॅडम, पत्रकार सुनील उंबरकर व गौतम वाघ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जंजाळ सर, शिक्षक शिवाजी पट्टे सर, सोनवणे सर, देठे सर, तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके आणि भोकरदन तालुका अध्यक्ष सुनील उंबरकर यांच्यासह कैलास बोडखे, राजू शिंदे, भागवत शिंदे आणि अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.