माहोरा येथे श्री रेणुका देवी नवरात्र उत्सवाचे नियोजन; दोन समित्यांची घोषणा
By गौतम वाघ

माहोरा येथे श्री रेणुका देवी नवरात्र उत्सवाचे नियोजन; दोन समित्यांची घोषणा
माहोरा (तालुका जाफ्राबाद): माहोरा गावातील ग्रामस्थांच्या वतीने यावर्षीचा श्री रेणुका देवी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन उत्सव नियोजन आणि शांतता समितीची स्थापना केली आहे. रामेश्वर शेळके यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत या समित्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या काळात हा नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असून, घटस्थापनेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये आरती, भजन, कीर्तन आणि भजनी मंडळांचे कार्यक्रम होणार आहेत.
उत्सवाच्या शांततापूर्ण आयोजनासाठी दोन स्वतंत्र समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि सर्व ग्रामस्थांनी या उत्सवात सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
नवरात्र उत्सव नियोजन समिती आणि उत्सव समितीची कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे:
१) नियोजन समिती: नवलसिंग जाधव, सुभाष बोरसे, समाधान मुठ्ठे, संजय शिंदे, बाळासाहेब गव्हले, अंकुश जाधव, रामेश्वर शेळके, राजू वाघ, उत्तमराव जाधव, कैलास पा. लहाने (ग्रा. पं. सदस्य).
२) उत्सव समिती: डॉ. मोक्षदा रवींद्र कासोद, अभिजीत थारेवाल, परमेश्वर कासोद, गजानन वाघ, शंकर गांडुळे, नारायण बावणे, दीपक बोरसे, कृष्णा पोपळे, सतीश शहागडकर, रामू कासोद, वकील विजय कासोद, सचिन गव्हले, गंगा बोरसे, संजय सदाव्रते, सुरेश वाघ, राजू सिरसाठ, प्रभाकर कासोद, दीपक सदाव्रते, सचिन कासोद, राजू अहिरे, लिबाजी लहाने.
यावेळी आयोजक रामेश्वर शेळके यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, “आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या आई कुलस्वामिनी रेणुका मातेचा उत्सव सर्वांनी आनंदमय आणि शांततेत साजरा करावा. तसेच, या उत्सवाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समितीला सहकार्य करावे.”