पारध बु. गावात पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त सुरू; D9 न्यूजच्या बातमीचा परिणाम, ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश.
By तेजराव दांडगे

पारध बु. गावात पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त सुरू; D9 न्यूजच्या बातमीचा परिणाम, ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश.
पारध, (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध बु. गावात पिसाळलेल्या, आजारी, आणि खरूज झालेल्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. या कुत्र्यांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात D9 न्यूजने ९ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामस्थांनी या समस्येची गंभीर दखल घेण्यासंदर्भात पारध बु. ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते.
या निवेदनाची आणि D9 न्यूजच्या बातमीची गांभीर्यपूर्वक दखल घेत पारध ग्रामपंचायतीने अखेर या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “आम्ही पारध बु. च्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू देणार नाही. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्नशील आहोत, पण त्यासाठी लागणारे मजूर मिळत नव्हते.”
ही मोहीम सुरू झाल्यामुळे गावातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, ग्रामस्थांनी D9 न्यूज आणि ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.
पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी