राजर्षी शाहू विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
By तेजराव दांडगे

राजर्षी शाहू विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
पारध, दि. ०१ : येथील भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या राजर्षी शाहू विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विलास लोखंडे होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचे विचार मांडले.
निलेश लोखंडे, विवेक पऱ्हाड आणि स्वप्नील वाघ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मानसी भारती हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर ज्ञानेश्वर आल्हाट यांनी प्रास्ताविक सादर केले. उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला भोरकडे मॅडम, गजानन लोखंडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.