पारध येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
By तेजराव दांडगे

पारध येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
पारध, दि. ०१ : येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना भाषण कलेमध्ये पारंगत करण्यासाठी शिक्षक श्री. लोखंडे, श्री. पाखरे, श्री. सोनुने आणि श्रीमती झोरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या श्रीमती लोखंडे आणि श्रीमती राऊत यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांच्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्याचा आणि त्यांचे साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी कु. श्रद्धा लक्कस आणि वैष्णवी लक्कस यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्कस आणि नियोजक श्री. रवी तबडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचा समारोप सूर्यकांत गालफाडे यांनी केला.