लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक दांडगे, सचिवपदी मिलिंद दांडगे यांची निवड
पारध बु।। येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात उत्साहात बैठक संपन्न

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक दांडगे, सचिवपदी मिलिंद दांडगे यांची निवड
पारध बु।। येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात उत्साहात बैठक संपन्न
पारध, दि. २७ जुलै, २०२५: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तेजस्वी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या जयंती उत्सवाला भव्य स्वरूप देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील पारध बु।। येथे ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजता पारध येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या समितीची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी एकजुटीने निर्णय घेत, उत्सव समितीच्या अध्यक्षपदाची धुरा दीपक दांडगे यांच्याकडे सोपवली आहे. तर, सचिवपदाची जबाबदारी मिलिंद दांडगे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी महादू दांडगे आणि गणेश दांडगे यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिव म्हणून दिनकर सुराशे, कोषाध्यक्ष म्हणून प्रमोद दांडगे आणि कार्याध्यक्ष म्हणून सागर दांडगे यांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून तेजराव दांडगे यांचीही निवड करण्यात आली असून, ते उत्सव समितीच्या कार्याला व्यापक प्रसिद्धी देण्याचे काम करतील.
यावेळी बैठकीस श्याम दांडगे, प्रदीप दांडगे, सुनील दांडगे, कृष्णा दांडगे, संतोष कांबळे, आदित्य दांडगे, अजय दांडगे, योगेश दांडगे, शशिकांत दांडगे, सुशील दांडगे, अनिल दांडगे, रोहन दांडगे, पवन दांडगे, रवी मानकर, अरुण काकफळे, अंकुश दांडगे, संतोष दांडगे, विशाल साळवे, सांडू दांडगे, गजानन साळवे, राहुल दांडगे, रवी बोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.