कल्याणी येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी एकास अटक
By तेजराव दांडगे

कल्याणी येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी एकास अटक
पारध, दि. १६ जून २०२५: भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथे आज सायंकाळी अवैध दारू विक्री करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली. गरबडसिंग भाऊलाल चांदा (वय ५३, रा. कल्याणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:४० वाजता कल्याणी ते वाकडी रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ आरोपीत गरबडसिंग चांदा हा विनापरवाना बेकायदेशीररित्या दारू विक्री करण्याच्या उद्देशाने दारूचा साठा बाळगताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून प्रत्येकी १८० मिलीलीटरच्या ‘भिंगरी संत्रा’ असे लेबल असलेल्या देशी दारूच्या आठ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची अंदाजित किंमत ८०० रुपये आहे.
या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल भगवान विक्रम जाधव यांनी तक्रार दिली. पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशाने या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खिल्लारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हा दाखल करणारे अधिकारी पोहेकाँ एस. बी. जावळे आहेत.