पारध येथे अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By तेजराव दांडगे

पारध येथे अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
पारध, दि. १६ जून २०२५: भोकरदन तालुक्यातील पारध येथे आज सायंकाळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदू सांडू घुले (वय ३०, रा. पारध खू) असे आरोपीताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:४० वाजता शेलूद ते पिंपळगाव रस्त्यावर आरोपीत नंदू सांडू घुले हा त्याच्या ताब्यातील लाल आणि पांढऱ्या रंगाच्या स्वराज कंपनीच्या (इंजिन क्र. DG400/SGK28108, चेसिस क्र. MBNAV53NMRCK19783) विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला काळ्या रंगाची ट्रॉली जोडून त्यात एक ब्रास वाळू भरून वाहतूक करत होता. ही वाळू शासनाची रॉयल्टी (परवाना) न भरता अवैध रित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन पारध येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक गणेश किसनराव निकाम यांनी तक्रार दिली. पोलिसांनी गुरनं १४५/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशाने या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकाँ पी. सिनकर हे करत आहेत. गुन्हा दाखल करणारे अधिकारी पोहेकाँ एस. बी. जावळे आहेत.