‘क्या हुआ तेरा वादा’ ची धून जालनाभर दुमदुमली: शिवसेनेचा ‘ठाकरी’ प्रहार!
By तेजराव दांडगे

‘क्या हुआ तेरा वादा’ ची धून जालनाभर दुमदुमली: शिवसेनेचा ‘ठाकरी’ प्रहार!
जालना, ५ जून (प्रतिनिधी): निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधाऱ्यांनी शेतकरी बांधवांना दिलेली ‘गोड’ आश्वासने, सत्ता मिळताच कशी ‘कडू’ झाली, याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जालना जिल्ह्यात ‘क्या हुआ तेरा वादा’ हे आगळेवेगळे शेतकरी जनआंदोलन सुरू केले आहे. भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेच्या शिलेदारांनी आज जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या दारी धडक देत, आश्वासनांच्या पूर्ततेची मागणी केली.
निवडणुकीपूर्वी ‘अमृत’, आता ‘विष’!
निवेदनात शिवसेनेने सत्ताधाऱ्यांच्या ‘निवडणूक’ घोषणांचा पाढा वाचला. कर्जमुक्तीपासून ते १५ हजार रुपये शेतकरी सन्मान निधीपर्यंत, लाडक्या बहिणींना २१०० रुपये मानधनापासून ते ४४ हजार गावांमध्ये पाणंद रस्त्यांच्या बांधकामापर्यंत, आणि एसजीएसटी अनुदानापासून ते एक रुपयात पीक विम्यापर्यंत अनेक स्वप्नं दाखवण्यात आली. वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपये मानधन, अन्नदाता ऊर्जादाता योजनेतून २४ तास वीज, शेतीमालाला हमीभाव, बी-बियाणे व खतांच्या किमतींवर नियंत्रण, हर घर जल-हर घर छत आणि मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्रीय मान्यता मिळवून देण्याचीही हमी दिली होती. ‘सरकार आलं की सगळं पूर्ण करू’ असा शब्दही दिला, पण आता हे सारे प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात असल्याचा तीव्र निषेध शिवसेनेने नोंदवला.
तालुकानिहाय ‘वादा’ आठवण करून देणारे शिवसैनिक!
जालना तालुका: उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, माजी सभापती मुरलीधर थेटे, शहरप्रमुख बाला परदेशी, उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, तालुका संघटक बाबुराव कायंदे, विभागप्रमुख बळीराम ढवळे, जनार्धन गिराम, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, शहरप्रमुख दर्शन चौधरी, बंजारा सेलचे शंकर जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बदनापूर तालुका: जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, कारभारी मसलेकर, ऋषीकेश थोरात, राजू जाधव, रामेश्वर फड, सुदामराव काळे, अनिस पठाण, बाबुराव गोडसे, बळीराम कोल्हे, औचितराव अंभोरे, अंकुश वाघ, केशव क्षीरसागर, विजय भवर, अर्जुन ठोंबरे, वैजीनाथ शिरसाट, दत्ता पडोळ, जावेद खान, श्रीराम धोंडीबा, राजेंद्र जऱ्हाड, संजय जऱ्हाड, शिवाजी कऱ्हाळे, सुधाकर खैरे आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले.
भोकरदन तालुका: उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, तालुकाप्रमुख कैलास पुंगळे, शहरप्रमुख महेश पुरोहित, विठ्ठल जाधव यांच्यासह उपस्थित होते.
जाफराबाद तालुका: उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, परमेश्वर जगताप, तालुकाप्रमुख कुंडलिक मुठ्ठे, माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, देविदास पैठणे, शिवाजी रगड, संतोष रगड, भगवत घोडके, शिवाजी गावंदे, गणपत बनकर, समाधान सवडे, गणेश सवडे, इम्रान शेख, अश्पाक कुरेशी, प्रसाद भुईटे, प्रल्हाद बनकर, वसंता फलके, विनोद शेळके, समाधान चव्हाण, समीर शहा, विनोद जाधव, राजू लोखंडे, विष्णू लोंखडे आदी शिवसैनिकांनी ‘आश्वासनांची आठवण’ करून दिली.
घनसावंगी तालुका: तालुकाध्यक्ष संदीप कंटूले, माजी जि.प. सदस्य देवनाथ जाधव, माजी पं.स. सभापती मधुकर साळवे, शिवसेना गटनेते यादव देशमुख, बबनराव घोगरे, राजेंद्र तांगडे, अर्जुन पवार, दिलीप कंटूले, शंतनू देशमुख यांसह शिवसैनिकांच्या सह्या निवेदनावर होत्या.
मंठा तालुका: नगरसेवक प्रदीप बोराडे यांच्यासह अनंता वैद्य, सचिन चव्हाळ, रवी काळे, राहुल बोराडे, इलियास शेख, राजेश पवार, गोरख चव्हाण, जुनेद पठाण, एहसान शेख, गजानन झोल, तानाजी मोरे, विजय तायडे, करण बोराडे, प्रवीण पंडित, ऋतिक जाधव, पवन जाधव, विठ्ठल जाधव, किशोर झोल, ऋषिकेश वाघ, संदीप जोशी, संदीप ढेगळे, विठ्ठल काकडे, माणिक ढेंगळे, वैभव मराठे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परतूर तालुका: उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, जिल्हा समन्वयक महेश नळगे, प्रभारी तालुकाप्रमुख भारत पंडित, तालुका समन्वयक अशोकराव आघाव, शिवसेना शहरप्रमुख दत्ता सुरुंग, दलित आघाडी तालुकाप्रमुख मधुकर पाईकराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय वाणी, उपसरपंच विठ्ठलराव वाटाणे, उपसरपंच दीपक काळे, प्रभाकर खंदारे, तुकाराम बोरकर, बाबुराव बोरकर, शाहीर खालापूर, राहुल कदम, गोपाळ माने, देविदास राठोड, वसंत बरकुळे, दादाराव बरकुले, माऊली राजबिंडे, गणपतराव खोसे, गोपाळ माने, राजू शिंदे, आबासाहेब कदम, बळीराम सोळंके, सुरेश भंडारी, बापू घटमाल यांसह असंख्य शिवसैनिक व युवा सैनिक सहभागी झाले होते.
अंबड तालुका: उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, पंडित गावडे, दिनेश काकडे, कुमार रुपवते, नंदकिशोर पुंड, बंडू पागिरे, राम लांडे, रमेश वऱ्हाडे, सिद्धेश्वर उबाळे, कल्याण टकले, प्रभाकर ब्रह्मणे, रजनीश कनके, रवी इंगळे, सुरेश राजपूत, गजानन सानप, शैलेश दिवटे, सीताराम धुळे, मुकुंद हुसे, संतोष मुर्तडकर, भुजंग सुरसे, किशोर दखणे, भास्कर चपटे, उमेश लटपटे, विश्वंभर गाडेकर, अशोक खरमुडे, राजू सरोदे, नवनाथ गिरी, भाऊसाहेब जाधव, अमोल टोपे आदींनी तहसीलदारांना निवेदन दिले.
या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांना शेतकरी बांधवांना दिलेली आश्वासने आठवतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.