भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
By तेजराव दांडगे

भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याची संधी
पारध, दि. 04: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बु येथे स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव यांच्या पुण्यतिथी निमित्त, पारध बु. ता. भोकरदन, जि. जालना व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
शिबिरात हृदयविकार, कान-नाक-घसा, नेत्रविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, आणि मानसिक आजार यांसारख्या विविध रोगांवर तपासणी केली जाईल. तसेच, हृदयरोग तपासणीसाठी मॉडर्न 2D-ECHO, E.C.G., कार्डिओग्राफी, रक्तदाब तपासणी उपलब्ध असेल. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, पेसमेकर, रिनल ॲन्जिओप्लास्टी आणि बायपास यांसारख्या शस्त्रक्रियांची तपासणी व मार्गदर्शन केले जाईल.
रक्तदान शिबिरही याच दिवशी आयोजित केले असून, रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजक:
• स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पारध बु. ता. भोकरदन जि. जालना.
• गोदावरी फाउंडेशन जळगाव.
• डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव.
शिबिराचे स्थळ व वेळ:
• स्थळ: राजेंद्रजी श्रीवास्तव महाविद्यालय पारध बु. ता. भोकरदन.
• वेळ: बुधवार, दि. ११/०६/२०२५ रोजी सकाळी १०:०० ते २:०० वाजेपर्यंत.
अधिक माहितीसाठी संपर्क:
• विक्रांत श्रीवास्तव: 9767471309
• आशिष मिश्रा: 9373350009
• रत्नशेखर जैन: 7030571111